Talathi Exam Saam tv
महाराष्ट्र

Talathi Exam : तलाठी भरती परीक्षा रद्द करा; स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक

Beed News : तलाठी भरतीसाठी नुकताच झालेला पेपर फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान यावेळी तलाठी भरती उमेदवारांची माहिती पब्लिक करण्यात यावी, २०२३ तसेच मागील २०१९ तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विनोद जिरे

बीड : तलाठी भरतीसाठी झालेली परीक्षा रद्द करा; अशी मागणी करत स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत विद्यार्थ्यांनी (Student) ही मागणी केली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेकडो विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. (Tajya Batmya)

तलाठी भरतीसाठी नुकताच झालेला पेपर फुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान यावेळी तलाठी भरती उमेदवारांची माहिती पब्लिक करण्यात यावी, २०२३ तसेच मागील २०१९ तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही घोटाळ्याचा तपास पारदर्शक होण्यासाठी, उच्च न्यायालयातील निवृत्त अथवा सिटिंग न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात यावी. चौकशी समितीत सायबर एक्सपर्ट, आयएएस, आयपीएस स्तरीय अधिकारी तसेच आमच्या विद्यार्थी प्रतिनिधींनीचा समावेश असावा. अशीही मागणी केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४५ दिवसाच्या आत परीक्षा घ्या 

२०२३ तलाठी भरतीचे अनेक पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने या परीक्षेला काहीही अर्थ उरलेला नाही. त्यामुळे तलाठी भरती रद्द करण्यात यावी. तलाठीची फेरपरीक्षा (MPSC) एमपीएससीमार्फत ४५ दिवसांच्या आत घेण्यात यावी. यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात. पेपरफुटी कायदा तत्काळ मंजूर करून लागू करण्यात यावा. पोलीस भरतीची जाहिरात तात्काळ काढण्यात यावी. या मागण्या यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. यावेळी घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT