Beed Maratha Reservation News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News: मनोज जरांगेंच्या सभेपूर्वीच बीडमध्ये ५० वर्षीय व्यक्तीने संपवलं जीवन; चिठ्ठीतून केली आरक्षणाची मागणी

Beed Maratha Reservation News: मराठा आरक्षणाची मागणी करत एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीडमधील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

विनोद जिरे

Beed Maratha Reservation News

मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, या सभेआधीच बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करीत एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. मधुकर खंडेराव शिंगण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मयत मधुकर शिंगण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब, राम राम... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे.

मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं, त्याचबरोबर शिंगण कुटुंबियांना सरकारी मदत जाहीर करावी, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी एका २४ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना धाराशिवमधील भूम तालुक्यात घडली आहे. अमरनाथ भाऊसाहेब कदम असं मृत तरुणाचं नाव असून तो गिरवली गावातील रहिवासी आहे. अमरनाथ हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिला होता.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT