Vilas PAwar  Saam TV
महाराष्ट्र

Beed News : मनोज जरांगेच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवांचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Beed man dies in antarwali sarati News : विलास पवार असं मृत तरुणाचं नाव आहे.

विनोद जिरे

Beed News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी राज्यभरातून लाखो नागरिक आंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. डोळे दिपवणारी ही गर्दी होती.

मात्र उन्हाचा तडाखा खूप असल्याने मराठा बांधवांना काही प्रमाणात त्रासही सहन करावा लागले. दरम्यान सभेसाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या 36 वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विलास पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. विलास बीडच्या गेवराई येथून या सभेसाठी जालन्यात आला होता. (Latest Marathi News)

विलास पवार या तरुणाला चालून चालून अतिशय थकवा आला होता. त्यानंतर चक्कर येऊ लागल्याने एका ॲम्बुलन्समधून त्याला गेवराई येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र प्रचंड वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्स देखील अडकली आणि सराटे अंतरवली ते गेवराई येथे येण्यासाठी तीन तास लागले.

याच दरम्यान विलास याचा ॲम्बुलन्समध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विलास पवार याला चक्कर आली होती. त्याचबरोबर उलट्यांचा त्रासही त्याला जाणवत होता. उष्माघातामुळे विलासचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali For Diabetes Patient: डायबिटीजच्या रूग्णांनी दिवाळीचा फराळ खावा की नाही? रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम

Pune News: सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडाल तर खबरदार, पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जारी

अखेर गोकुळचा अध्यादेश निघाला; सरकारच्या 4 संचालकांची नेमणूक|VIDEO

Walking For Weight Loss: एका आठवड्यात १ किलो वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती तास चालावे? जाणून घ्या

Traditional Mangalsutra For Women: महिलांसाठी ट्रेडिशनल मंगळसूत्र डिझाईन्स, साडी आणि ड्रेसवर दिसतील उठून

SCROLL FOR NEXT