Beed Lok Sabha Election 2024: Pritam Munde or Pankaja Munde? Raosaheb Danve's Latest Statement Raises Suspense on BJP Candidature SAAM TV
महाराष्ट्र

Beed Lok Sabha Election 2024: बीडमध्ये सस्पेन्स वाढला, त्यात रावसाहेब दानवेंनाही 'नो गॅरंटी'; उमेदवार नक्की कोण?

Nandkumar Joshi

विनोद जिरे, बीड

Beed Lok Sabha Election 2024 :

भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीत लोकसभेच्या अनेक मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू असताना, बीडमध्येही उमेदवारीबाबत प्रचंड संभ्रम असल्याचं चित्र आहे. भाजपकडून बीडमधून पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे यांना उमेदवारी द्यावी, असा प्रश्न असताना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या विधानानं पेच आणखी वाढला आहे. प्रीतम मुंडे, भागवत कराड आणि माझीही उमेदवारी नक्की नाही, असं वक्तव्य दानवे यांनी करून सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसली तरी, त्याआधीच महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती, तसेच इतर पक्षही जागावाटपाबाबत चर्चा करत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत जागावाटप जाहीरही होतील. पण त्याआधी काही जागांवरून पेच वाढलेला दिसून येत आहे. महायुतीतील घटकपक्षांमध्ये काही जागांवरून अहमहमिका सुरू आहे. तर महाविकास आघाडीमध्येही रस्सीखेच सुरू आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बीड मतदारसंघात उमेदवारीबाबत कमालीचा संभ्रम असल्याचं चित्र आहे. पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे, असा प्रश्न नेतृत्वाला पडलेला असतानाच, भाजपचेच ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका वक्तव्यानं सस्पेन्स वाढवला आहे. खासदार प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड आणि माझीही उमेदवारी नक्की नाही, असं दानवे म्हणाले.

प्रीतम मुंडे, कराड आणि माझी उमेदवारी निश्चित नाही असं सांगतानाच, भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल, तो अंतिम असतो, असं रावसाहेब दानवे म्हणाले. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं संभ्रमात आणखी भर पडली आहे.

दुसरीकडे रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. याबाबत रावसाहेब दानवे यांना विचारलं असता, त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मित्रपक्षांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम आम्ही करू. त्यांची समजूत काढण्यात येईल आणि योग्य मार्ग काढू, असं ते म्हणाले.

दानवे, कराड बीडमध्ये

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री भागवत कराड हे बीडमध्ये पोहोचले. रेल्वेसंबंधी विविध मुद्दे आणि विकासकामांचा त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी विद्यमान खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

Fact Check: 99 रुपयांत मिळणार दारू? सरकारचं आणलं नवं मद्य धोरण? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? वाचा...

Tirupati laddu news : तिरूपतीच्या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल; आरोप-प्रत्यारोपांचा तडका, राजकीय फोडणी

Maharashtra Politics: मविआत मोठा भाऊ कोण? जागांवर अडले, भाऊ-भाऊ भिडले; मविआत जागावाटपावरून खडाजंगी

Budgam Bus Accident Video: काश्मीरमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना; BSF जवानांनी खचाखच भरलेली बस खोल दरीत कोसळली, ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT