Pune Politics: लोकसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेस नेत्याचा "लेटर बॉम्ब"; अंतर्गत धुसफूस आली चव्हाट्यावर

Pune Politics News: पुणे लोकसभेच्या रिंगणात कोणत्या उमेदवाराला उतरवयाचे आणि आपला विजय कसा पक्का करायचा यासाठी काँग्रेस पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. रवींद्र धंगेकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam Tv
Published On

(सचिन गाड, मुंबई)

Pune Lok Sabh Election Congress Leader Letter To Nana Patole:

राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. उमेदवारांच्या जागावाटपासाठी राजकीय आघाड्यांनी बैठकांचा सपाटा लावलाय. महाविकास आघाडीत सुद्धा जागावाटपासाठी बैठकांचा दौर सुरू झालाय. याच दरम्यान या आघाडीमधील सर्वात महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आलाय.(Latest News)

पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) रिंगणात कोणत्या उमेदवाराला उतरवयाचे आणि आपला विजय कसा पक्का करायचा यासाठी काँग्रेस पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. पुणे लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेस (Congress) पक्षात मतभेद असल्याचं समोर आल्याचं सांगितलं जात आहे. या अंतर्गत धुसफूसचा धूर काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या 'लेटर बॉम्ब'मुळे समोर आलाय. दरम्यान पुणे लोकसभेसाठी (Lok Sabha) रवींद्र धंगेकर यांचं नाव चर्चेत आहे. मात्र आता आबा बागुल यांनी यावरून थेट नाना पटोले यांना पत्र दिले आहे. या पत्रावरून उमेदवारीसाठी धंगेकर यांना विरोध असल्याची चर्चा पुणे परिसरात रंगू लागलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल हा "लेटर बॉम्ब" टाकत उमेदवारी देण्यावरुन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुचना केलीय. जनतेचं कौल मत घेऊन उमेदवारी देण्यात यावी, अशी सुचना नाना पटोले यांना आबा बागूल यांनी दिलीय. ''उमेदवारी देण्याआधी तुम्ही जनमताचा कौल घ्या आणि मग उमेदवार ठरवा," असं बागुल यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.

दरम्यान धंगेकर यांना विरोध का केला जात आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नामागे बागुल यांची महत्त्वकांक्षा लपलीय. आपण ३० वर्ष झाले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. उमेदवारी देताना जनमताचा विचार करावा, असा सल्ला बागुल यांनी नाना पटोले यांना दिलाय.

Nana Patole
Lok Sabha Election 2024 : महायुतीचं ठरलं! पुढील ४८ तासांत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com