Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरले! वकिलावर लोखंडी रॉड अन् दगडाने हल्ला, हॉटेल मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा

Beed Police: बीडमध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हॉटेलमध्ये लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

Priya More
  • बीडमध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला

  • लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण

  • हॉटेल मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आमच्या विरोधातल्या लोकांची लय वकिली करतोस असे म्हणत या वकिलावर हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड आणि दगडाने वकिलावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात वकील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील केज शहरातील कळंब रोडवरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. वकील मंगेश भोसले यांच्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. दिवाणी वादात विरोधी लोकांची बाजु घेतल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

हॉटेल मालक सत्यम लोहीया, विष्णुदास लोहीया आणि त्यांच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी वकिलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सत्यम लोहीयाने वकिलाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले, तर इतरांनी दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामध्ये वकिल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात ९ आरोपींविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. दरम्यान पूर्वीचा जागेवरून सुरू असलेल्या वादाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामध्ये वकिलावर हल्ला झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT