Beed Kej News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : पोहायला गेला तो परतलाच नाही, अभियंत्याचा बुडून मृत्यू; आठ तास शोधल्यानंतर मिळाला मृतदेह

Beed Kej News : बीडच्या केज तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल आठ तास शोध घेतल्यानंतर अभियंत्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडच्या केज तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केजमधील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तब्बल आठ तास शोध घेतल्यानंतर अभियंत्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. अभियंत्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यामधील कानडी माळी परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरु आहे. या ठिकाणी सचिन गोरे हा अभियंता कार्यरत होता. सहकाऱ्यांसह जवळच असलेल्या एका खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी सचिन गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने खदानीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

मृत सचिन मोरे हा मुळचा लातूर येथील रहिवासी आहे. तो बीडच्या केज तालुक्यातील कानडी माळी परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत होता. जवळच असलेल्या एका खदानीच्या पाण्यात सचिन त्याच्या सहकाऱ्यांसह पोहण्यासाठी गेला, पोहत असताना तो पाण्यात बुडाला. सहकाऱ्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

खूप शोध घेऊनही सचिन सापडत नसल्याने सहकाऱ्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल आठ तासानंतर सचिन गोरेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मोठ्या प्रकल्पातील अभियंत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT