महाराष्ट्र

Beed Jarange Sabha: एकदा काय मोठा समुदाय खवळला तर...; मुदत संपण्याआधीच जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Manoj jarange Beed Sabha : बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय. सभेची गर्दीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला.

Bharat Jadhav

बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय. सभेची गर्दीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. त्याच बरोबर त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबत जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही. देशातील मोठी जात तुम्ही संपवण्याचा घाट घातलाय. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला नक्की जड जाणार असा इशारा जरांगेंनी दिलाय.(Latest News)

मराठा आरक्षणसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय राहील हे सांगण्यासाठी बीड जिल्ह्यातील मनोज जरांगे-पाटील सभा घेतली. पुढील आंदोलन २० जानेवारीला मुंबईत होणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला. सरकार मराठा समाजाला डिवचत आहे. मराठ्यांना फसवत मराठा सामजाचा अपमान करतय. आपल्या आंदोलनाला सहजपणे घेतलं जात आहे, पण सरकारला वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यांत असल्याचं जरांगे म्हणालेत.

मराठ्यांना आणि त्यांच्या लेकराला आरक्षण हवं आहे. बीड जिल्ह्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं जो मराठ्यांच्या नादाला लागला त्याला सुट्टी नाही. मराठा समाजाला आरक्षण कशाप्रकारे आरक्षण घेणार हे बघा. या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण देण्याचं आपलं स्वप्न आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आणि आम्ही तेच घेणार असल्याचं ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

मराठा समाजाला राज्यात शांतता हवी आहे. परंतु तरूणांना खोट्या आरोपात अडकवलं जात आहे. निष्पाप पोरांना गुतंवण्याचं काम सरकार करत आहे. पण सरकारने लक्षात ठेवावं की, एकदा काय मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुफडा साफ करेल. तोपर्यंत मराठा समाज थांबणार नाही, असा इशारा जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT