Maratha Reservation
Maratha ReservationSaam Tv

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून मोठी अपडेट! या तारखेला मोठा निर्णय येण्याची शक्यता

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. २४ जानेवारीला या पीटिशनवर निकाल लागेल असा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय.
Published on

Supreme Court Maratha Reservation Curative Petition :

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात मोठी बातमी हाती आली आहे. सर्वोच्च न्यायालायने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून त्याचा निकाल २४ जानेवारीला लागेल असा दावा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय. (Latest News)

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार (State Government) आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही याचिका स्वीकारलीय असून येत्या २४ जानेवारीला यावर निकाल लागेल असा दावा मराठा आरक्षण (Maratha Reservation) याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय. २४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवलीय. याच अर्थ, क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नाकारले नसून ते स्वीकारलंय. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल," असं विनोद पाटील यांनी याविषयीची माहिती देताना म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारले जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Maratha Reservation
Maratha reservation Protest: बीडमधील ST बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द; महामंडळाच्या निर्णयाने प्रवाशांचे हाल, कारण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com