Wardha News: उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ निष्ठा यात्रा; वर्ध्यातील तरुण सायकलवर करणार ८६४ किमीचा प्रवास

Wardha Latest News: वर्ध्यामधील तरुणांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. हे तरुण तब्बल 864 किलोमीटरचा प्रवास करुन मातोश्रीवर दाखल होणार आहेत.
Wardha News
Wardha NewsSaamtv
Published On

चेतन व्यास, वर्धा| ता. २३ डिसेंबर २०२३

Wardha News:

शिवसेना पक्षामध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना समर्थन देताना दिसत आहेत. वर्ध्यामधील तरुणांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी निष्ठा यात्रेला सुरूवात केली आहे. हे तरुण तब्बल 864 किलोमीटरचा प्रवास करुन मातोश्रीवर दाखल होणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ वर्ध्यातून सायकलने शिवसैनिकांची निष्ठा यात्रा काढण्यात आली आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात आज वर्धेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही यात्रा सुरु झाली आहे.

वर्धा ते मातोश्री (Wardha To Matoshree) असा हा प्रवास असणार आहे. युवा परिवर्तन की आवाज संघटना आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना या यात्रेत सहभागी होणार असून वर्धा ते मुंबई असा ८६४ किलोमीटरच अंतर 9 दिवसात सायकलने पूर्ण करून ही यात्रा मातोश्री येथे पोहचणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Wardha News
Maratha reservation Protest: बीडमधील ST बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द; महामंडळाच्या निर्णयाने प्रवाशांचे हाल, कारण काय?

या यात्रेच्या माध्यमातून बेरोजगारी, उद्योगांची अवस्था, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, घरकुल व आरोग्याच्या समस्या यावर लक्ष वेधल्या जाणार आहेय. यात्रा ज्या गावातून जाणार त्या गावात कॉर्नर सभा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहे. यात्रेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचा मुख्य उद्देश या यात्रेचा असल्याच सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Wardha News
Ayodhya Ram Mandir: सव्वा दोन कोटी रामनाम जप पुस्तिका पाठविल्या जाणार अयोध्येला, नंदनगरीतील नागरिकांचा उपक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com