BEED FIRING: PETROL PUMP NEAR GUNFIRE, VALMIK KARAD GANG CONNECTION SURFACES saam tv
महाराष्ट्र

बीड पुन्हा हादरलं! पेट्रोलपंपाजवळ गोळीबाराचा थरार; वाल्मीक कराड कनेक्शन आलं समोर

Beed Petrol Pump Firing Valmik Karad Gang Connection: बीडच्या इमामपूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ किरकोळ वादातून चार राऊंड गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. गोळीबार करणाऱ्यांचे वाल्मीक कराडसोबतचे फोटो आणि रील व्हायरल झाल्याचा दावा आहे.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीडमध्ये पुन्हा एकदा वाल्मीक कराड गँग दहशत माजवत असल्याचे समोर आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या कारागृहात असला तरी त्याचे गांवगुंड मात्र बीडमध्ये उन्माद माजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या एक ते दोन वर्षांपासून बीड हा राज्यात सर्वात जास्त गुन्हे घडणारा जिल्हा असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे छायेत नागरिक हे वावरत आहे.

अशातच आज शहरात इमामपूर भागात किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर थेट गोळीबारामध्ये झाले. घटनेची माहिती मिळताच बीडचे वरिष्ठ पोलीस अधिकारी घनस्थळी दाखल झाले. गोळीबार करणारे हे वाल्मीक कराड गँग असल्याचे उघडकीस झाले आहे. गोळीबार करणाऱ्यांचे वाल्मीक कराडसोबत रील आणि फोटो आता व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादातून गोळीबाराची ही धक्कादायक घटना घडली. शहरातील इमामपूर रोडवर पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेसातच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी चार राऊंड फायर करण्यात आले असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, किरकोळ लहान मुलांच्या वादातही धोकादायक शस्त्र आणि गोळीबारी होत आहे. यात वापरले जाणारे अवैध शस्त्र येतात कुठून यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच बीडमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सुदैवाने यात कोणाला गोळी लागली नाही.

मात्र लाठीकाठीने मारहाण केल्यानंतर एक जण जखमी झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाल्मीक कराड याला जेलमध्ये 5 स्टार सुविधा मिळत असल्याचा स्थानिक नेत्यांनी आरोप केला होता. तसेच तो मोबाइलचा देखील वापर करत आहे. जेलमधूनच तो आपली दहशत कायम ठेवत आहे का? असा प्रश्न आजच्या घटनेते उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : पाणी टंचाईची कटकट संपली! मुंबईच्या तलावांमध्ये ८९.४९ टक्के पाणीसाठा, कोणते तलाव किती भरले? जाणून घ्या

पैसे अपूर्ण मिळाले म्हणून 'खरेदीखत' अवैध ठरत का? मालकी हक्क कोणाचा असतो, सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय काय?

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

SCROLL FOR NEXT