Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : बायको भांडून पुण्याला गेली, नराधम बापाकडून ११ वर्षीय पोटच्या चिमुकलीवर अत्याचार; बीडमध्ये नेमकं चाललंय काय?

Father Accused of Assaulting Baby Girl Beed News: नेकनूर परिसरातील एका गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या ११ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, माजलगावात भरदिवसा बाबासाहेब आगे यांच्यावर झालेला हल्ला, आणि आता बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत समोर आलेली एक अत्यंत संतापजनक घटना.

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे आपली तळ पायाची आग मस्तकात जाईल. एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बीडमधील नेकनूर येथील एका गावात एक जोडपे राहत आहे. त्यांना ११ वर्षांची मुलगी देखील आहे. पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेला. त्यानंतर पत्नी संतापून पुण्याला निघून गेली. मात्र ती एकटीच गेली. आई आपल्या मुलीला घेऊन गेली नाही. मुलगी बापासोबत एकटीच राहत होती.

शुक्रवारी रात्री राहत्या घरात नराधम पित्याला दुर्बुद्धी सुचली. त्याने घरातच पोटच्या मुलीवर अत्याचार केला.

पीडित मुलीची आई पुण्याहून परतली. तेव्हा मुलीने बापाने केलेल्या दुष्कृत्याची माहिती दिली. याची माहिती मिळताच आईच्या पाया खालची वाळू सरकली. तिला संताप अनावर झाला. पीडित मुलीच्या आईने थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम पित्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम पित्याविरोधात तक्रार नोंदवून घेत तपास करत आरोपीला अटक केली. आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

SCROLL FOR NEXT