हे दृश्य पाहा....एखाद्या सिनेमातील थरारक दृश्य वाटेल...पण नाही हे वास्तवात घडतंय. धावत्या बसमध्ये अशा पद्धतीने लूटमार केली जातेय. हे सगळे गुन्हे बीड, धाराशीव जिल्ह्यात घडतायेत.
सोलापूर-धुळे महामार्गावर लुटमार आणि बॅग लंपास करण्याच्या घटना वाढल्यात. पोलिसांच्या नाकावर टिच्चून बसमध्ये दरोडे पडतायेत. पाचोड ते येडशी यादरम्यान प्रवासी वाहन अडवून किंवा थांबलेल्या वाहनातील प्रवाशांना धमकावून लूटमार केली जात आहे. तसेच प्रवासी बसवर ठेवलेल्या बॅगाही लंपास केल्या जातायेत. महामार्गावर गुन्हे वाढत असताना चोरांचा माग काढला जातोय, असं पठडीतलं उत्तर देत प्रवाशांनाच खबरदारी घेण्याची सूचना बीड पोलिसांनी केली आहे.
महामार्गावर सात गस्ती पथके तैनात केली आहेत. मदतीसाठी 112 नंबर डायल करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्याशिवाय मदतीसाठी वाशी, नेकनूर, येरमाळा पोलिस निरीक्षकांचे मोबाईल नंबरही जारी करण्यात आले आहेत. चोरांना पकडण्यासाठी हॉटेलच्या कर्मचा-यांचीही मदत घेतली जात आहे. मांजरसुंबा घाटासह 10 ठिकाणं धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलंय.
मांजरसुंबा घाट, चौसाळा बायपास
पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा
इंदापूर फाटा, पार्डी फाटा, येडशी बायपास
घुले माळजवळचा पूल, तेरखेडा ते टोल
चोरट्यांची लूटमार करण्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे ते पाहूया..
कृत्रिम अपघात घडवून मदत करण्याच्या बहाण्याने लुटणे
दुचाकीस्वारांना लक्ष करणे
कृत्रिम गतीरोधक तयार करुन वाहन थांबवून लुटणे
थांबलेल्या वाहनांमधून इंधनचोरी करणे
दुभाजकाचा वापर करुन वाहनावर हल्ला करणे
निर्मनुष्य ठिकाणी थांबू नका
समूहाने प्रवास करा
दुभाजकापासून अंतर ठेवा
संशयास्पद वस्तू दिसल्यास गाडी थांबू नका
संशयास्पद वाटल्यास हॉटेल, पेट्रोल पंप, धाबा अशा वर्दळ असलेल्या ठिकाणी थांबा
शहरांमध्ये आणि गावांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेतच. मात्र आता महामार्गही सुरक्षित राहिले नाहीत. इथल्या दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असताना जनता कुठे सुरक्षित आहे? असा सवाल केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.