Beed Flood  saam Tv
महाराष्ट्र

Beed Flood: बीडमध्ये पावसाचं रौद्ररूप, सिंदफणा नदीला महापूर; शेती- गावं पाण्याखाली, पाहा ड्रोन VIDEO

Beed Rainfall: बीडमध्ये तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामध्ये अनेक जण अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू केले जात आहे. या पूराचे ड्रोन व्हिडीओ समोर आले आहेत. यातून पूराची भीषण परिस्थिती दिसून येत आहे.

Priya More

Summary -

  • बीडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे सिंदफणा नदीला महापूर आला आहे.

  • ९ नागरिक पूरात अडकले अशून प्रशासनाकडून त्यांना रेस्क्यू केले जात आहे.

  • पूरामुळे शेती, जनावरं आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

  • पूरग्रस्त गावांतील भयानक परिस्थितीचा ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये पावसाचा हाहाकार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या सतत पडणाऱ्या पावसामुळे बीडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधील सिंदफणा नदीला पूर आला आहे. पूराचे पाणी गावात आणि शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक जण पूरात अडकले आहेत. पूरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. सिंदफणा नदीच्या पूरामुळे बीडमध्ये नुकसान झालेल्या परिसरातील ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे.

बीडच्या सिंदफणा नदीकाठच्या हिंगणी हवेली येथील पुराच्या पाण्यामध्ये जवळपास ९ नागरिक अडकले आहेत. त्यांना रेस्क्यू करण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. सिंदफणा नदी पात्राने रौद्ररूप धारण केले असून याचा फटका या गावकऱ्यांना बसला आहे आणि गेल्या जवळपास १० तासांहून अधिक काळ झाला आहे हे नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहे. साम टीव्हीच्या खास प्रेक्षकांसाठी सिंदफणा नदीकाठच्या गावांचे पूरामुळे कसे हाल झाले आहे हे ड्रोन दृश्य टिपण्यात आली आहेत.

बीड जिल्ह्यातील कडा आष्टी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. शेत पिकं मातीसह वाहून गेली आहे. जनावरं देखील वाहून गेली आहेत. शेतीचं, घराचं अन् जनावरं दगावल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले आहे. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT