बोटचालक क्षणात गेला वाहून…; बीडच्या पुरात घडली हृदयद्रावक घटना|VIDEO

Boatman Swept Away In Beed Sindphana River: बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला असून बोटचालक प्रचंड प्रवाहात वाहून गेला आहे. बचावपथकाकडून शोधमोहीम सुरू असून जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Summary

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर.

बोट घेऊन नदी पार करण्याचा प्रयत्न करणारा बोटचालक वाहून गेला.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

प्रशासन सतर्क, बचावपथकाकडून शोधमोहीम सुरू.

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. कासार भागातील मणिकर्णिका नदीला पूर आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, हीच नदी पार करण्यासाठी बोट घेऊन जाणाऱ्या बोटचालकाला पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहून नेलं. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. सध्या बचावपथकाकडून शोधमोहीम सुरू असून बोटचालकाचा काहीही आतापता लागत नाही. मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासन सतर्क झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com