Ajit Pawar meets flood-hit farmers in Beed saam Tv
महाराष्ट्र

Beed Flood: शेतकऱ्यांच्या अश्रूंना किंमत मिळणार, अजित पवारांसमोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो; पाहा VIDEO

Ajit Pawar meets flood-hit farmers in Beed: अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची ते पाहणी करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या.

Priya More

महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूर येऊन मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे ७० लाख एकरावरील शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे. घरं, शेतीचे नुकसान त्याचसोबत जनावरं देखील दगावली यामुळे बळीराजा संकटात आला आहे. सध्या राज्यातील नुकसानग्रस्त भागामध्ये मंत्र्याचा पाहणी दौरा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळपासूनच बीडच्या नुकसानग्रस भागात पाहणीला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

बीड जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामधील पिकं पुराच्या पाण्यात वाहून गेली. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी अजित पवार कालपासून करत आहेत. आज सकाळी अजित पवार हिंगणी खुर्द गावामध्ये दाखल झाले असून ते पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी आली व्यथा मांडली. काही शेतकऱ्यांना तर अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवार यांनी शेतकऱ्यांनी दिलासा देत पैसे मिळून जातील असे सांगितले.

अजित पवार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी प्रश्नाचा पाढा वाचला. 'दादा तुम्ही पहिले पालकमंत्री आहात की आमच्या गावामध्ये आलात. आजपर्यंत एकही पालकमंत्री आमच्या गावामध्ये आला नाही. दादा मात्र इथे आम्हाला अधिकारी सहकार्य करत नाहीत. तलावाचा विषय असेल विम्याचा विषय असेल किंवा रस्त्याचा विषय असेल. दादा आम्हाला सोयी सुविधा द्या तुम्हाला विनंती आहे.', अशी विनंती शेतकऱ्यांनी दादाकडे केली.

यावेळी एक शेतकरी म्हणाला, मुंडेसाहेब आले की मला पहिले भेटायचे. दादा म्हणाले मी पण तुलाच भेटायला आलोय. यामध्ये राजकारण नकोय. आपल्याला राजकारण नकोय मार्ग काढायचा आहे. राजकारण निवडणुकीच्या टायमाला करू.' तर दुसरा शेतकरी अजित पवारांना म्हणाला की, 'तुमचा कणखर बाणा मला आवडतो. मिठी मारू का तुम्हाला?'

बीडच्या हिंगणी खुर्द येथे एका महिलेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हंबरडा फोडला. 'माझ्या मोबाईलवरून कुणीतरी पैसे काढून घेतले आहेत. तो मोबाईल मुलाकडे होता. मला मालकही नाहीत. माझा मुलगाही मयत झाला आहे. दादा मला मदत करा. लाडक्या बहिणीचेही पैसे त्याच अकाउंटला येत आहेत. ते पोस्टाचे खातं आहे.', असे म्हणत नुकसान झालेल्या एका महिलेने अजित पवारांसमोर टाहो फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - - अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये नफा देण्याचे दाखवत २५ कोटींची फसवणूक; दीडशेहून अधिक नागरिकांनी केली गुंतवणूक

SCROLL FOR NEXT