Beed Flood News : Saam tv
महाराष्ट्र

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Beed Flood News : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. या पावसात अनेक रहिवाशी पुरात अडकले आहेत.

Vishal Gangurde

बीड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे सिंदफणा आणि गोदावरी नद्यांना पूर

कुर्ला गावात ७५ नागरिक पुरात अडकले

नागरिकांच्या प्रकृतीवर तातडीने वैद्यकीय उपचार

आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागाची होडीतून पाहणी

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमध्ये पावासाने धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यातील शेतशिवारात पाणी शिरलं आहे. काही गावात कमरे एवढं पाणी साचलं आहे. तर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील कुर्ला गावातील ७५ नागरिक पुरात अडकले होते. या नागरिकांची एनडीआरएफचे जवानांनी सुटका केली. दुसरीकडे आमदार धनंजय मुंडे यांनी होडीतून पूराची पाहणी केली.

बीडच्या सिंदफणा नदीला पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या कुर्ला गावाला फटका बसला आहे. या पुरात कुर्ला गावातील 75 नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. बीडच्या कुर्ला गावात अडकलेल्या या नागरिकांना एनडीआरएफच्या पथकाकडून सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

एनडीआरएफच्या पथकाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन केलं. जवानांनी प्रचंड अंधाराच्या काळोखातही ऑपरेशन यशस्वी केलं आहे. मात्र, पुरात अडकलेल्या नागरिकांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे प्रथमोचारासाठी सैन्याचे वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे संपूर्ण साहित्य, सलाईन, स्ट्रेचर संपूर्ण औषधासहित या ठिकाणी पोहोचले. या गावात एकूण आठ वैद्यकीय अधिकारी पोहोचले आहेत.

धनंजय मुंडे यांची होडीतून पुराची पाहणी

बीडमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे संपर्क तुटलेल्या परळी तालुक्यातील पोहनेर गावात आमदार धनंजय मुंडे यांनी थर्माकोलच्या होडीतून (चप्पू) जाऊन गावकऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. तसेत यावेळी त्यांनी गावकऱ्यांना धीर आणि दिलासा दिला. तसेच त्यांनी संपूर्ण पूरपरिस्थिती पाहता मदतकार्य आणि उपलब्ध यंत्रणांचा आढावा घेत प्रशासनास कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महसूल प्रशासन, पोलीस अधिकारी यांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते.

नाशिकच्या गिरणा नदीला पूर, सावकी-विठेवाडी रस्ता बंद

नाशिकच्या चणकापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने गिरणा नदीला पूर आलाय. पूरामुळं देवळा तालूक्यातील विठेवाडी-सावकी पूलावरुन पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरची वाहतूक ठप्प् झाली आहे. तसेच यामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना अन्य मार्गाने जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. चणकापूर आणि पूनंद धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने गिरणा नदीला पूर वाढलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT