Beed Dowry Case  saam tv
महाराष्ट्र

Dowry : आणखी एक वैष्णवी! बीडमध्ये दहा लाखांसाठी सासरच्यांनी विवाहितेला संपवलं, आई-वडील धाय मोकलून रडले

Beed Dowry Case : बीडमध्ये एका विवाहित महिलेचा हुंड्यापायी जीव गेल्याची घटना समोर आली आहे. दहा लाख रुपयांसाठी सासरच्यांनी विवाहितेला विष पाजून मारल्याची घटना घडली आहे.

Yash Shirke

  • बीडमध्ये दहा लाख रुपयांसाठी विवाहित करिष्मा सांगळेवर सासरच्यांनी विष पाजून हत्या केली.

  • करिष्माच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी अद्याप मोकाट आहेत.

  • या घटनेमुळे करिष्माची अडीच वर्षांची मुलगी अनाथ झाली, परिसरात मोठी खळबळ उडाली.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Dowry News : बीड जिल्ह्यात मारहाण, दरोडा, खून अशा घटना थांबायचं नाव घेत नाहीत. अशातच वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील बावी येथे करिष्मा सांगळे या विवाहित महिलेला सासरच्यांनी विष पाजून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

करिष्मा सांगळे यांच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तुझ्या आई-वडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये. नाहीतर तुला मारुन टाकू. दोन दिवसांपूर्वी सासरच्या लोकांनी करिष्माला धमकी दिली होती. त्यानंतर आम्ही ५० हजार रुपये पाठवले होते. आमची परिस्थिती देण्यासारखी नव्हती. त्या लोकांनी याचा गैरफायदा घेतला, असा आरोप मृतक करिष्माच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आमच्या मुलीला वारंवार टॉर्चर केले. सासरकडचे तिला त्रास द्यायचे. तुझ्या आईवडिलांकडून, भावांकडून पैसे घेऊन ये, नाहीतर घरी येऊ नको. घर बांधायचं आहे, तू पैसे घेऊन आलीच पाहिजेस अशा धमक्या ते लोक द्यायचे. हा धमक्यांचा, जाच आणि छळाचा प्रकार मागील एका वर्षांपासून सुरु होता, असे करिष्माच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

२८ ऑगस्ट रोजी करिष्माला तिच्या सासरच्यांनी विष पाजून मारले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना तात्काळ शोधण्यात यावे अशी मागणी करिष्माच्या कुटुंबाने केली आहे. मयत करिष्मा सांगळे हीला अडीच वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे ही मुलगी पोरकी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025 : दिवाळीला घरी किती दिवे लावावे? वाचा शुभ आकडा

Symptoms of heart attack in kids: लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' 5 लक्षणं; पालकांनी दुर्लक्ष करू नये

Rohit Patil: माजी गृहमंत्र्यांच्या लेकाचं शिक्षण किती? आहे सर्वात तरुण आमदार

Raj Thackeray: नुकतेच १८ वर्षे पूर्ण केलेल्या...,राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सणसणीत प्रश्न|VIDEO

Washim : अट्टल मोटरसायकल चोरटा ताब्यात; ९ मोटरसायकल जप्त, रिसोड पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT