Jarange Patil names Kanchan and dhanjay munde in assassination plot claim Saam TV marathi news
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange accuses Dhananjay Munde murder conspiracy Beed : मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे आणि 'कंचन' यांच्यावर हत्येच्या कटाचा थेट आरोप केला आहे. जरांगे यांनी पोलिस तक्रार नोंदवली असून त्यांनी दोन संशयितांचे नावही घेतले; तपास आणि राजकीय परिणाम पुढे कसे जातील, ते पाहणे महत्वाचे आहे.

Namdeo Kumbhar

Jarange Patil names Kanchan and dhanjay munde in assassination plot claim : हत्येच्या कटाप्ररणी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केला आहे. धनंजय मुंडे माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप केला. धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असलेला कांचन याचेही नाव मनोज जरांगे पाटील यांनी घेतले आहे.

धनंजय मुंडे आणि कांचन यांच्यामध्ये २० मिनिटांची चर्चा झाली. त्यांनी दोन व्यक्तीला सोबत घेऊन घात करण्याचा प्रयत्न केला. आधी मला बदनाम करण्याचा डाव आखला. पण त्यात यश मिळाले नाही. त्यानंतर जिवे मारण्याचं ठरवलं. पण तेही त्यांना जमलं नाही. त्यानंतर त्यांनी औषध, विष द्यायचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. आम्ही सावध असल्याने हे शक्य झाले नाही. मराठ्यांनी शांत राहावे, मी लढायला खंबीर आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाने शांत राहावे. कारण, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा. पण मी आहे तोपर्यंत शांत राहा. त्यांनी काही कऱण्याआधीच त्यांचे डाव उघडे पाडलेत. समाजासाठी लढायला तयार आहे. सतर्क, सावध नसतो तर आपल्याला सर्व मिळाले नसते. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे कुणीही असो सर्व नायनाट होणार, तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही हसला पाहिजे असे काम करून दाखवतो. आता सुखाचे दिवस आले आहेत, असे सर्वजण म्हणतील, असे मनोज जरांगे म्हणाले.

आपलेसुद्धा हात खूप लांब आहेत, ते त्यांच्या लक्षात आले असेल. माझ्यावरील हल्ल्याआधी त्यांचे सर्व डाव उघडे पडले. माझ्या समाजासाठी लढायला खंबीर आहे. मराठा बांधवानी शांत राहावे. सर्व मराठा नेत्यांनी, ओबीसी नेत्यांनी सावध राहावे. आपले मतभेद असतील-नसतील.. पण माझ्यावर वेळ आली ती तुमच्यावरही येऊ शकतो. मराठा नेत्यांनी हा विषय सहज घेऊ नये. ही घटना गांभीर्याने घ्यावी. या वृत्तीचा आपल्याला नायनाट करावाच लागेल, त्याशिवाय थांबणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. सर्वांनी शांत राहावे. मी सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप ठरलो नसतो. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. फक्त तुम्ही शांत राहा

पोलिसांनी त्यांना अटक करावे की सोडून द्यावे.. काही घेणं नाही. बीड आणि जालनामधील सर्व पक्षाचे १०० प्रमुख नेते, कार्यकर्ते बसले होते. जनतेच्या कोर्टात खरे काय ते सर्वांना माहिती आहे. तपासात काय ठरवता, हे त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला काहीही शंका नाही.

मी कुणाचेही नाव घेणार नाही, कारण कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून सुरू आहे. दोन जणांना अटक केली. बीडमधील एक कार्यकर्ता की पीए... या दोनपैकी एका आरोपीकडे गेले. इथून खरी सुरूवात झाली. दोन आरोपी आणि बीडच्या त्या व्यक्तीने या दोघांना नेलं. ते सर्वजण माझं शोधत होतं. त्या दोघांकडून करून घेणं पहिल्यांदा ठरले. खोटे व्हिडिओ रेकॉर्डिंग घ्यायचे यासाठी विषय सुरू होतं. पण त्यांना काहीच मिळाले नाही. मग ते दुसऱ्या मुद्दयावर आले.. खून करून टाकायचा, त्यातही काही झाले नाही. मग तिसऱ्या मुद्द्यावर आले.. गोळ्या-औषधं देऊ घातपात देऊ असे त्यांचे ठरले होते. या नीच औलादी संपली पाहिजे. ते मी करतो.. फक्त तुम्ही शांत राहिले पाहिजे, असे जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Idli Recipe: इडली चिकट, वातड होतेय? मग पिठात 'हा' १ पदार्थ वापरा; मऊ लुसलुशीत होतील इडल्या

Blast In Mosque: नमाजावेळी मशिदीमध्ये स्फोट, ५४ जण जखमी, घटनास्थळी सापडली AK-47

Mercury Vakri In Tula: 10 नोव्हेंबरपासून 'या' 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस; 12 महिन्यांनी बुध ग्रह होणार वक्री

Eye Care: तुम्हालाही रोज आयलाइनर लावायला आवडत? तर होऊ शकतात हे वाईट परिणाम, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT