Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: माझ्या बहिणीचा नाद सोड...; तरुणावर जीवघेणा हल्ला, चाकूने सपासप वार अन् लोखंडी रॉडने मारहाण

Beed News: बीडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तरुणीच्या भावाने आपल्या मित्रांसह तरुणावर चाकू आणि रॉडने हल्ला केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More
  • बीडच्या माजलगावमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

  • प्रेम प्रकरणातून ४ जणांनी चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण केली

  • या हल्ल्यात संजय गायकवाड गंभीर जखमी झाला

  • हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. चाकूने सपासप वार आणि लोखंडी रॉडने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बीडच्या माजलगावमध्ये ही घटना घडली. 'माझ्या बहिणीचा नाद सोड, तिच्याशी तुझे लग्न होऊ देणार नाही', असे म्हणत चार जणांनी तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना २२ मे रोजी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव येथील एका चहाच्या हॉटेलबाहेर संजय गायकवाड नावाच्या तरुणावर प्रेम प्रकरणातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुलीच्या भावासह एकूण ४ जणांनी २२ मे रोजी त्याच्यावर हल्ला केला होता. 'माझ्या बहिणीचा नाद सोड, तिच्याशी तुझे लग्न होऊ देणार नाही' असे म्हणत त्याच्यावर चाकूने वार केले होते आणि लोखंडी रॉडने अमानुष हल्ला केला होता.

या हल्ल्यामध्ये संजय गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या तरुणाच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचे हात-पाय फॅक्चर झाल्याने बीडच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. या भीषण हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून ते व्हायरल झाले आहे. पीडित संजय गायकवाडच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिस ठाण्यात ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विलास घुले नावाच्या तरुणाची हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. हा तरूण कदमवाडी फाटा परिसरातील हॉटेल गावकरी येथे शनिवारी रात्री गेला होता. त्या हॉटेलबाहेरच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलासचा मृत्यू झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावे या मागणी नातेवाईक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : इंटिरिअर डिझायनरही सांगतात या भन्नाट होम डेकोर टिप्स!

Maharashtra News Live Update: डोंबिवली मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंसह चार आरोपींना २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

स्मार्ट मीटरच्या अफवांवर महावितरणचे स्पष्टीकरण; नेमकं काय सांगितलं?

VIRAL VIDEO: वाढदिवसाचा बॅनर दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडला अन्...हायवेवरचा थरार, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Makeup Tips: घाम किंवा पावसामुळे मेकअप होणार नाही खराब! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT