Beed Crime Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: तू माझ्याशी का नाही बोलत? चारित्र्याच्या संशयावरून तरुणीवर जीवघेणा हल्ला; घरात घुसून चाकूने सपासप वार, परळी हादरले

Young Woman Stabbed in One Sided Love Attack: बीडमध्ये तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. घरात घुसून तरुणीवर चाकूने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.

Priya More
  • बीडच्या परळी शहरात २३ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला

  • घरात घुसून चाकूने सपासप वार करण्यात आले

  • एकतर्फी प्रेम आणि वादातून आरोपीने केला हल्ला

  • तरुण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

योगेश काशिद बीड

तू मला का बोलत नाहीस? असं म्हणते एका तरुणाने तरुणीवर चाकूने सपासप वार करत हल्ला केला. बीडच्या परळी शहरातील पंचशीलनगर परिसरात ही घटना घडली. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीवर तरुणाने चाकूने सपासप वार केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे परळीत शहरात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातल्या जवळा गावामध्ये राहणारी पीडित तरुणी परळी वैजनाथ येथील पंचशीलनगर परिसरात एका खोलीत भाड्याने राहत होती. शुक्रवारी रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास संशयित आरोपी अनंत पाटलोबा गित्ते (रा. मालेवाडी, ता. परळी वैजनाथ) हा पिडितेच्या घरी गेला. चारित्र्याच्या संशयावरुन यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत 'तू मला का बोलत नाहीस.' असे म्हणत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपीने चाकूने तरुणीच्या उजव्या हातावर, पोटावर तसेच डाव्या हाताच्या दंडावर सपासप वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी तरुणीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी दुपारी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 118(2), 118(1), 115 (2) आणि 351 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सदिप चव्हाण हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

EPFO New Rules: कामाची बातमी! PF मध्ये झाले ९ मोठे बदल, थेट तुमच्यावर होणार परिणाम, आताच घ्या माहिती जाणून

मूड खराब असेल तर घ्या सुट्टी! काय आहे ‘Unhappy Leave’ पॉलिसी? समजून घ्या सविस्तर

भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीही भाजपचाच निघाला; राज्यात खळबळ

Dosa Recipe : मुलं दुधी भोपळा खात नाहीत? मग 'असा' बनवा कुरकुरीत डोसा, एकदा चव चाखताच पुन्हा पुन्हा मागतील

SCROLL FOR NEXT