Beed Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : "तू मला आवडतेस..." बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग; ओढणी ओढली अन्...

Beed Crime News : बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कुटी अडवून आरोपीने तरुणीशी गैरवर्तन करत तिच्या बहिणीला मारहाण केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये भररस्त्यात तरुणीचा विनयभंग

  • स्कुटी अडवून आरोपीचे गैरवर्तन

  • बहिणीला मारहाण व जीवे मारण्याची धमकी

  • पोलीस तपास सुरू

  • महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बीडमध्ये एका तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणी आपल्या बहिणीसोबत स्कूटीवरून जात असताना, काही टवाळखोर तरुणांनी पीडितेची स्कूटी अडवून "तू मला खूप आवडतेस" असे म्हणत तिचा हात धरला आणि ओढणी ओढून गैरवर्तन केले.इतकेच नाहीतर मध्यस्थी करणाऱ्या पीडितेच्या बहिणीला आरोपींनी मारहाण केली असल्याचे उघड झाले. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी आरोपी तरुणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील गांधीनगर भागात १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पीडित तरुणी आणि तिची बहीण टायपिंग साठी जिल्हा स्टेडियमकडे स्कुटीवर जात होत्या. याचदरम्यान अल कबीर हॉटेल जवळ अकबर याकूब कुरेशी या तरुणाने त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.

त्यानंतर तरुणींची स्कुटी अडवत पीडितेच्या बहिणीसोबत भांडू लागला आणि पीडित मुलीचा हात धरून तू मला आवडतेस असा म्हणाला. तसेच तिची ओढणी देखील ओढल्याचा संतापजनक प्रकार केला. यावेळी पीडितेने आणि तिच्या बहिणीने प्रतिकार केला असता आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत चापटाने मारहाण केली.

तरुणींनी आरडाओरडा केला असता आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले. याआधीच आरोपीने तरुणींना कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला. याप्रकरणी आता पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: कर्जत खोपोलीमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT