Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : तुला माझा नवरा खुप आवडतो का ? विवाहितेला पाजले विषारी द्रव्य, तिघांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

Beed News : "तुला माझा नवरा खूप आवडतो का ? तू कशाला त्याला बोलती ? असे म्हणत एका महिलेस मारहाण करत विषारी द्रव पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे.(Maharashtra News)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बीडच्या चाकुनाईक तांड्यावर ही घटना घडली. सुनीता पंडित राठोड (वय 26, रा. चाकुनाईक तांडा, ता. गेवराई) असं मारहाण करून विषारी द्रव्य पाजलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत " तुला माझा नवरा खूप आवडतो का ? तू कशाला त्याला बोलती ? असे म्हणत त्यांना तिघांनी मारहाण केली. विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान सुनीता राठोड यांच्या फिर्यादीवरून सविता जाधव, कविता जाधव आणि दत्ता जाधव या तिघांविरोधात बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.

मुलगी झाली म्हणून विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण

बीड (beed crime news) जिल्ह्यातील अन्य एका घटनेत तुला मुलगी झाली असे म्हणत विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे. एवढचं नाही तर जेसीबीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेला चिमुकल्या मुलीसह घराबाहेर हाकलण्यात आले आहे.

हा धक्कादायक प्रकार बीडमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून बुलढाणा जिल्ह्यातील दाेघांवर (पती व सासु) बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (shivajinagar police station beed) झाला आहे. पाेलिस संशयितांचा शाेध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

SCROLL FOR NEXT