Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : गळ्यातून मंगळसूत्र चोरणारी महिला ताब्यात; दुसऱ्यांदा चोरी करायला जाताना सापडली

Beed News : चोरी करून देखील पोलिसांनी पकडले नाही; या समजातून पुन्हा त्याच बसस्थानकात आरोपी गवळण गायकवाड दागिने चोरीच्या उद्देशाने बसस्थानकावर गेली.

विनोद जिरे

बीड : बीड बसस्थानकात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दरम्यान लेकीचे मिनी गंठण (Beed) आईच्या गळ्यातून गेल्या आठवड्यात चोरी गेले होते. या चोरी गेलेल्या गंठनचा बीडच्या स्थानिक पोलिसांनी (Beed Police) शोध लावला असून गंठण चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकत गंठण जप्त केले आहे. (Latest Marathi News)

गवळण पांडुरंग गायकवाड (वय ४०, रा. माउलीनगर, पेठ बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. बीड बसस्थानकात गेल्या आठवड्यात सुलभा मनोज गाडे (वय ४५, रा. वाघोली, पुणे) या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी गेले होते. या प्रकरणी पोलिसात (Police) तक्रार देण्यात आली होती. या (Theft) चोरीचा पोलिसांकडून तपास सुरु होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान चोरी करून देखील पोलिसांनी पकडले नाही; या समजातून पुन्हा त्याच बसस्थानकात आरोपी गवळण गायकवाड दागिने चोरीच्या उद्देशाने बसस्थानकावर गेली. याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तिला चोरी करताना बेड्या ठोकल्या. यावेळी तिच्याकडून चोरलेले २ तोळ्यांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून गंठन परत मिळाल्याने महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Encounter: दिल्लीमध्ये मध्यरात्री मोठी चकमक, बिहारच्या ४ गँगस्टर्सचा पोलिसांकडून एन्काऊंटर

Attack on Singer: 'यह तो बस शुरुआत है।', प्रसिद्ध गायकावर बेछूट गोळीबार, पोटाला लागली गोळी; हल्ल्यामागचं कारणही समोर

Maharashtra Live News Update: नांदणी मठाच्या जागेत माधुरी हत्तीनीसाठी प्रस्तावित केअर सेंटरसाठीचे परवाने २० दिवसांत सादर करण्याचे आदेश

IND vs AUS: सिरीज जिंकायची असेल तर भारतासाठी 'करो या मरो'; १७ वर्षांचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार टीम इंडिया?

Maharashtra Rain Alert : राज्यावर पावसाचं सावट कायम, पुढचे ४ दिवस महत्वाचे; आज २० जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT