Beed Crime News Update Saam TV
महाराष्ट्र

बीडमध्ये नेमकं चाललंय काय? मुलासमोरच बापाचा १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

beed Crime : बीडमध्ये सावत्र बापाने १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. मुलीची आई बाहेर गेल्यानंतर बापाने संतापजनक कृत्य केले.

Namdeo Kumbhar

योगेश काशिद | बीड प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Beed Crime News Update : सावत्र पित्याने १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक आणि नात्याला काळीमा फासणारी निंदनीय घटना केज शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

केज शहरात वास्तव्यास असलेल्या पीडित १३ वर्षीय मुलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने, दोन मुली झाल्यानंतर नऊ वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आठ वर्षांपूर्वी तिने आरोपीसोबत दुसरे लग्न केले. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा झाला. पीडित मुलगी ही आई आणि सावत्र पित्यासोबत राहत होती. ९ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता पीडितेची आई माहेरी गेली होती, तेव्हा मुलगी घरी एकटीच होती. दुपारी १२:३० च्या सुमारास सावत्र पित्याने घरी येऊन, "आई कुठे गेली?" अशी विचारणा केली. मुलीने गावाला गेलेल्या आईला फोन करून "कधी येणार?" असे विचारले असता, आईने "येण्यास वेळ लागेल" असे सांगितले.

हीच संधी साधून सावत्र पित्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मोबाईल देऊन खाली बसवले आणि पीडित मुलीसोबत लज्जास्पद कृत्य करू लागला. मुलीने विरोध केला आणि "आईला सांगेन" असे म्हटले, तेव्हा "आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील" असे धमकावत नराधम पित्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. आई घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे पाहून तिने चौकशी केली. मुलगी घाबरलेली असल्याने सुरुवातीला काही बोलली नाही, मात्र आईने विश्वासात घेऊन विचारल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला.

१२ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १९८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६४(३)(एफ), ६५(१) आणि पोक्सो कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT