Police Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : संतापजनक! तरुणाने अल्पवयीन मुलीचा आंघोळ करताना बनविला व्हिडिओ; बीडमधील धक्कादायक प्रकार

बीडमध्ये दिवसेंदिवस छेडछाडीचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे बीडमध्ये महिलांविरोधात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये दिवसेंदिवस छेडछाडीचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे बीडमध्ये महिलांविरोधात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. याचदरम्यान, माजलगावमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २७ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढल्याचा संतापजनक प्रकार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा अंघोळ करत असतानाचा चोरून व्हिडिओ बनविल्याचा संतापजनक प्रकार केला. तरुणाच्या संतापजनक कृत्याने बीडच्या (Beed) माजलगावात एकच खळबळ माजली. अल्पवयीन मुलीने हा प्रकार तिच्या कुटुंबला सांगितला.

अल्पवयीन मुलीच्या कुटुंबानेही आरोपीच्या विरोधात एकच संताप व्यक्त केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबाने पोलिसांत (Police) धाव घेतली. पोलिसांत पीडित मुलीने २७ वर्षीय अविविहित तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नेमंक काय घडलं ?

अल्पवयीन मुलगी आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ चोरून बनविल्याचा संतापजनक प्रकार केला. बीडच्या माजलगाव शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना २७ वर्षीय तरुणाने तिचा व्हिडिओ बनविला आहे.

या प्रकरणी २७ वर्षीय अविवाहित तरुणावर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आरोपी तरुणाला माजलगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आरोपी तरुणाचा मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.

धक्कादायक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवुन नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिमडी या ठिकाणी ही घटना घडली असून २१ वर्षीय तरुणा विरुद्ध बलात्कार,पोस्को,आणि अँट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Yoga Exercise: फिट राहण्यासाठी सकाळी करा फक्त ही 5 योगा

Konkan Kanya Express: कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! आता सीट पक्कीच समजा; ‘कोकणकन्या-मांडवी’ला जादा डबे

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Success Story: मल्टी नॅशनल कंपनीतील नोकरी सोडली, UPSC परीक्षेची तयारी केली, तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश; IAS अभिषेक शर्मा यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT