Nanded Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: बीड हादरलं! धावत्या कारमध्ये महिलेवर तिघांकडून अत्याचार

Beed Crime News: बीड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये धावत्या कारमध्ये एका महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

विनोद जिरे

Beed News: बीड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये धावत्या कारमध्ये एका महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकरासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेच्या पतीचे कोरोनात निधन झालं. यानंतर गेल्या वर्षभरापासून त्या महिलेचे एका व्यक्तीबरोबर संबंध होते. वर्षभरापासून हे दोघेही शहरांमध्ये राहत होते.

काल पीडित महिला बार्शी रोडवरून येत होती. एका कारमध्ये तिच्या प्रियकराने व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी महिलेस कारमध्ये बळजबरीने बसवून गाडी मांजरसुब्याच्या दिशेने सुसाट नेली. बीड ते मांजरसुंबा या दरम्यान प्रियकरासोबत असणाऱ्या दोन नराधमांनी महिलेला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला.

यानंतर सात्रा पोत्रा या ठिकाणी गेल्यानंतर प्रियकराच्या पत्नीने सुद्धा पीडित महिलेला मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली असून महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आज बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकर सह अन्य दोघे व एका महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जळगावमध्ये आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यात गोंड गाव येथे काल आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर केवळ गोंड गावात नव्हे तर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी,त्यासाठी जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा,अशी मागणी होत आहे.

तसेच उज्वल निकम यांच्या सारख्या ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात यावी आणि मुलीच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत शासनाने करावी, या मागणीसाठी आज सर्व पक्षियांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बंदचे आवाहन केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khardi Kasara : लोकल प्रवाशांसाठी खूशखबर! कसारा-खर्डी मार्गावर सुरू झाली तिसरी मार्गिका; प्रवास होणार सुपरफास्ट

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT