Beed Online Shopping Fraud Crime News Saam TV
महाराष्ट्र

Online Shopping Fraud: लोन घेऊन महागडा मोबाइल ऑनलाइन मागवला; बॉक्स उघडताच बसला ४४० व्होल्टचा झटका

Beed Crime News: बीडमध्ये एका तरुणाने अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला. मात्र, बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी कपडे धुण्याच्या दोन साबणी निघाल्या.

विनोद जिरे

Beed Crime News: आजकाल सर्वांचाच ऑनलाईन खरेदीवर मोठा भर आहे. मात्र, यातून फसवणूकही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बीडमध्ये एका तरुणाने अमेझॉनवरुन ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला. मात्र, बॉक्समध्ये मोबाईल ऐवजी कपडे धुण्याच्या दोन साबणी निघाल्या.  (Latest Marathi News)

आपली फसवणूक झाल्याचं कळताच तरुणाने तातडीने बीडच्या (Beed News) सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. रमेश प्रभाकर गायकवाड (रा. भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड) असं फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रमेश गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, त्यांनी ॲमेझॉन वेबसाईडवरुन ऑनलाईन (Online Shoping) 28 हजार 998 रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाइल हा एसबीआय क्रेडिट कार्ड ईएमआयवरुन 2 हजार 617 रुपये हप्त्याप्रमाणे खरेदी केला.

त्यानंतर ॲमेझॉनकडून यांचे पार्सल आले. ते उघडल्यानंतर त्यामध्ये मोबाईल आढळून आला नाही. तर त्याऐवजी दोन इएक्सओ कंपनीच्या कपडे धुण्याच्या साबणी आढळून आल्या. याचा पूर्ण व्हिडीओ तक्रारदाराकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, मोबाइल ऐवजी साबण पाठवून माझी फसवणूक (Crime News) करणाऱ्याविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रमेश गायकवाड यांनी केली आहे. तरुणाची ऑनलाइन फसवणूक झाल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT