Kej Crime Saam tv
महाराष्ट्र

Kej Crime : केज गटशिक्षणाधिकारी विरोधात विनयभंगाचा गुन्हा; अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

Beed News : गटशिक्षणाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण विभागाच्या केज गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपी बेडस्कर त्या ठिकाणीच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रिया वेळेस उपस्थित होता. मग त्याला पोलिसांनी त्याच वेळेस ताब्यात का घेतलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात खळबळ उडविणारी बातमी समोर आली आहे. कारण केज येथील गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर याच्याविरुद्ध केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा बेडसकर याने प्रयत्न केला. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

नागरिक येताच काढला पळ 

दरम्यान घटनेत बेडसकर याने रात्री साडेआठच्या दरम्यान पिडीत मुलगी आणि तिच्या मावशीसह बहिणीला नाश्ता चारण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत बसवून निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे त्याने एका १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिथे काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर याने तेथून पळ काढला. याप्रकरणी केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल करतेवेळी संशयित पोलीस स्टेशनमध्येच 

तर ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळेस हा आरोपी त्याच पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्याचा फोटो देखील समोर आला आहे. मग पोलिसांनी त्याच वेळेस या गटशिक्षणाधिकारी आणि आरोपी बेडसकर याला ताब्यात का घेतलं नाही? असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - ओला दुष्काळ जाहीर करा, उबाठाने केली मागणी..

GK : कोणत्या देशात पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे? जाणून घ्या

Vijaydurg Fort History: गुप्त बोगदे, भक्कम तटबंदी..., जाणून घ्या विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेने २०० कोटींची निधी वळवला, पुण्यातील तब्बल ८०० कामे रखडली

Bullet Train: बुलेट ट्रेन सुसाट! घणसोली- शिळफाटा बोगद्याचं ५ किमीचं काम पूर्ण, पाहा जबरदस्त VIDEO

SCROLL FOR NEXT