Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : चॉकलेटचे आमिष देत शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न; मुलाच्या सतर्कतेने बचावला, जमावाकडून चोप

विनोद जिरे

बीड : शाळेत जाणाऱ्या मुलींसह मुले देखील आता सुरक्षित राहिलेले नाही. कारण मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री केली जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे बीडच्या केज शहरात एका शालेय विद्यार्थ्याला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या मुलाच्या सतर्कतेने अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. 

बीड (Beed News) जिल्ह्याच्या केज शहरातील अंकुर मस्के या विद्यार्थ्यास चॉकलेटचे आमिष दाखवून गाडीमध्ये बस असे सांगत अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गेल्या काही दिवसापासून हे अपहरणकर्ते मुलाचा पाठलाग करत त्याला गाडीमध्ये बसण्यास सांगत होते. रोज होत असलेल्या या प्रकाराबाबत मुलाने कुटुंबीयांना घडत असलेल्या प्रकारची माहिती दिली. यामुळे कुटुंबीय सतर्क होऊन (Crime News) त्यांनी पाळत ठेवण्यास सुरवात केली.  

जमावाकडून संशयितास चोप 

मुलाने सांगितल्यानुसार कुटुंबीयांनी पाळत ठेवत मुलाच्या पाठीमागे जात याबाबत खातरजमा केली. संशयित आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला पकडले. यानंतर जमलेल्या नागरिकांच्या जमावाने संशयितास चांगलाच चोप दिला. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने, पोर्स्टमॉर्टम अहवाल आला समोर

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

konkan : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

PM Modi Pune Visit : PM नरेंद्र मोदी २६ रोजी पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा सविस्तर

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

SCROLL FOR NEXT