Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Beed: अवैध गर्भपात प्रकरणी गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला 7 दिवसांची पोलीस कोठडी...

निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली चालवायचा अवैध गर्भपात केंद्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड - मुलाच्या हव्यासापोटी विवाहितेचा निर्दयीपणे अवैध गर्भपात केल्याची घटना 3 दिवसांपूर्वी परळीत (Parali) उघडकीस आली आहे. या प्रकरणी अवैध गर्भपात करणाऱ्या डॉ. नंदकुमार स्वामी याला पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या असून त्याला काल सायंकाळी उशिरा, न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ. स्वामीवर यापूर्वीसुद्धा अवैध गर्भपाताचे 3 गुन्हे दाखल आहेत.

परळीतील एक दाम्पत्यानं एका मित्राच्या मदतीने, डॉ स्वामीकडे अवैधपणे गर्भलिंग चाचणी केली. त्यात त्या दाम्पत्याला दुसऱ्यांदा मुलगी होणार हे कळलं. पती आणि सासूच्या सांगण्यावरून डॉक्टरनं त्या महिलेला एक इंजेक्शन देत, महिलेच्या इच्छेविरोधात अवैधरित्या गर्भपात केला. या प्रकरणी परळी न्यायालयाने डॉ. नंदकुमार स्वामी याला 7 दिवसाची म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील पाहा -

नंदकुमार स्वामी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहे. प्राथमिक माहितीनुसार तो एका रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करत होता. तिथे शिकलेल्या या जुजबी ज्ञानावर तो लोकांसमोर डॉक्टर म्हणून वावरू लागला. बार्शीतल्या दत्तनगर परिसरात निसर्गोपचार केंद्राच्या नावाखाली त्याने अवैध गर्भापात केंद्र सुरु केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील झाला होता.

सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात देखील त्याचे हे अवैध व्यवसाय सुरूच होते. 2017 साली परळी, बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात स्वामी हा अवैध गर्भपाताचे केंद्र चालवायचा. त्याच्या काळ्या धंद्याचा पोलिसांना सुगावा लागला आणि त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी. अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातील अनेक संघटनांनी केली होती.

त्यानंतर 3 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने नंदकुमार स्वामीला जामीन मंजूर केला. जामीनावर बाहेर असलेल्या स्वामीने बीडमध्ये पुन्हा अवैध गर्भपात करायला सुरुवात केली. मात्र, त्याच्या याच काळ्या धंद्याची माहिती ज्या महिलेचा त्याने गर्भपात केला त्याच महिलेने परळी पोलिसांना दिली. यामुळं पुन्हा पोटात कोवळ्या कळ्यांना कुस्करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT