BEED WOMAN SUICIDE CASE: FAMILY ALLEGES DOWRY HARASSMENT BY HUSBAND AND IN-LAWS IN GEVRAI Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : बीड हादरलं! २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या; कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

Beed Crime News : बीडमध्ये नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बीडच्या गेवराईमधील धक्कादायक घटना

  • २० वर्षीय नवं विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली

  • सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ

  • पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

योगेश काशीद, बीड

Beed Puja Surwase Sucide News लग्न झाल्यावर सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या बीडच्या लेकीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या गेवराई शहरातील २० वर्षीय नवविवाहित महिला पूजा प्रमोद सुरवसे हिने आपल्या आयुष्याचा दोर कापला. या प्रकरणी मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी पती, सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी व पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा प्रमोद सुरवसे (Pooja Survase) ही गेवराई (Gevrai Sucide News) शहरात पतीसोबत राहत होती. पूजाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेच्या दिवशी तिचा संपर्क कुटुंबीयांशी झाला होता. मात्र, काही वेळानंतर तिच्या वडिलांना फोन करून पूजाने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. ही बातमी समजताच कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांना पूजाचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, मृत महिलेच्या भावाने गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे (Pramod Surwase), सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे हे वारंवार बिझनेससाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. तसेच या मागणीसाठी पूजाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सतत होत असलेल्या त्रासामुळे आणि छळामुळे पूजा खचली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तपास अधिकारी संजय उदगीरकर यांनी दिली. दरम्यान सुशिक्षित महाराष्ट्रात अशा किती पूजांचा बळी हुंड्यासाठी जाणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

End of life symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा मृत्यू जवळ आलाय!

आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची यंदाच्या वर्षीची थीम काय आहे?

भाजी करपली? फेकून देऊ नका, दह्याची ही सोपी ट्रिक वापरून बघा

SCROLL FOR NEXT