Beed Crime News x
महाराष्ट्र

Beed Crime : लग्नानंतर १० महिन्यातच भांडणाला कंटाळला, वेगळं राहायला गेला म्हणून बायकोची सटकली, माहेरच्यांना बोलावलं अन्...

Beed Crime News : पत्नीच्या त्रासाला, सततच्या कटकटीला कंटाळून एका व्यक्तीने वेगळ्या ठिकाणी राहण्याचे ठरवले. पण हा निर्णय त्याच्या पत्नीला आवडला नाही. तिने माहेरकडच्यांना बोलावले. संतापलेल्या मेहुण्यासह पत्नी आणि सासूने त्या व्यक्तीला जबर मारहाण केली.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीड : लग्नानंतर सततच्या भांडणाला कंटाळून पतीने वेगळ्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेताच संतापलेल्या पत्नीने भाऊ आणि आईला बोलावून घेत पतीचा पाठलाग केला आणि त्यांनी मिळून पतीला जबर मारहाण केली. या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामहरी मोरे असे मारहाण झालेल्या पतीचे नाव आहे. त्याचे लग्न गेल्या वर्षी मे महिन्यात झाले होते. पत्नीसह तो बीडमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होता. लग्नानंतर रामहरी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले. त्यानंतर रामहरीने बीडमध्येच दुसऱ्या ठिकाणी खोली भाड्याने घेत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

पती वेगळा राहायला जाणार ही बाब खटकल्याने रामहरीच्या पत्नीने त्याच्या मेहुण्याकडे तक्रार केली. मेहुण्याने चारचाकी कारमधून रामहरीचा पाठलाग केला. भररस्त्यात गाठत तिघांनी रामहरीला लाथा बुक्क्यांनी आणि दगडांनी मारहाण केली. मारहाणीत रामहरीचा डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लग्नानंतर दहा महिन्यातच पत्नीच्या त्रासाला कंटाळून रामहरी मोरे या व्यक्तीने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. वेगळ्या ठिकाणी राहण्याचा रामहरीच्या निर्णयामुळे त्याची पत्नी संतापली. तिने भावाला, आईला आणि मेहुण्याला याबाबत सांगितले. तिच्या माहेरच्या लोकांनी रामहरीला रस्त्यात मारहाण केली. आता या प्रकरणात रामहरीची पत्नी, मेहुणा-मेहुणी, सासू यांच्या विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

SCROLL FOR NEXT