santosh deshmukh case saam tv
महाराष्ट्र

Beed : तुझाही संतोष देशमुख करू; हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टरच्या भावावर प्राणघातक हल्ला

Sarpanch Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टरच्या विरोधात त्याच्या भावाने लेखी तक्रार दिली आहे. डॉक्टरच्या सांगण्यावरुन माझ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे फिर्यादीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

Yash Shirke

  • बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीत असलेल्या डॉक्टरच्या भावावर प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल.

  • फिर्यादी रामहरी वायबसे यांनी जुन्या शेतीच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला झाल्याचा आरोप केला.

  • डॉ. संभाजी वायबसे आणि पत्नी सुरेखा वायबसे कडून सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप.

  • १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याची घोषणा.

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed Crime : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या डॉक्टर संभाजी वायबसे यांच्या विरोधात आज (१२ ऑगस्ट) पोलीस अधीक्षकांकडे त्यांचे बंधू रामहरी वायबसे यांनी लेखी तक्रार दिली. वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना पळून जाण्यासाठी मदत केलेल्या वायबसे कुटुंबीयांकडून मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

केज न्यायालयाच्या आवारात २०२३ मध्ये जुन्या शेतीच्या वादातून सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने डॉक्टर संभाजी वायबसे यांच्या सांगण्यावरुन आपल्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला, असा आरोप फिर्यादी रामहरी वायबसे यांनी केला आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांनी पोलिसांकडे सुपूर्त केले आहेत.

'डॉ. संभाजी वायबसे आणि त्यांची पत्नी ॲड. सुरेखा वायबसे हे वारंवार धमक्या देत असून जगणे अवघड झाले आहे. आमचं कुटुंब दहशतखाली आहे', असे रामहरी वायबसे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायबसे आणि त्यांच्या पत्नीची चौकशी होऊनही काहीही झाले नाही, असे फिर्यादी यांनी म्हटले आहे.

'तू त्यांच्या (संभाजी वायबसे) नादाला लागू नकोस नाहीतर तुझाही संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देत जून महिन्यामध्ये प्रमोद डोईफोडे आणि दिपक डोईफोडे यांनी लोखंडी रॉडने हल्ला केला' असे फिर्यागीच्या तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे. १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करणार असल्याचे फिर्यादी रामहरी वायबसे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

Tirgrahi Yog: 50 वर्षांनंतर बनणाऱ्या त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचे येणार अच्छे दिन; तीन ग्रहांमुळे मिळणार

Mental Health : रील्स स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे मेंदूवर होणारे पाच घातक परिणाम

Karuna Munde : धनंजय मुंडेंचे मुंबईत ३ फ्लॅट, पण मुक्काम मात्र सरकारी बंगल्यावर, करूणा मुंडे अन् अंजली दमानियांचा गंभीर आरोप

ध्वाजारोहणास छगन भुजबळांचा नकार, मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, महायुतीत नेमकं काय सुरू?

SCROLL FOR NEXT