Beed Crime News saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा खळबळ! गळ्यावर, पाठीवर कोयत्याने वार, तरुणावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला

Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाई शहरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. दोघाजणांनी या तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा बीड जिल्हा हादरला आहे. बीडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. जखमी तरुणावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरीजवळ राजकुमार करडे (वय ३०, रा. गवळीपुडा, अंबाजोगाई) याच्यावर दोन तरुणांनी हल्ला केला. त्याच्या पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने वार केले. आरोपींनी गळ्यावर, डोक्यात आणि पाठीवर वार करुन पीडित तरुणाला गंभीर जखमी केले.

जखमी तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. हा हल्ला कोणी केला? कोणत्या कारणांमुळे हा हल्ला करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्हा हादरुन गेला होता. त्यानंतर बीडमधून दररोज नवनवीन घटना समोर येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज अंबाजोगाईमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार झाल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! धनंजय मुंडेंनी हत्येचा कट रचला, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Cheapest Plans: Jio, Airtel आणि Vi चे बजेट प्लॅन, कमी पैशात २८ दिवस कॉलिंग, डेटा अन् बरंच काही...

Bigg Boss 19: या स्पर्धकाला बिग बॉसने दिली सुपर पॉवर; आता घरातील सदस्यांना करणार नॉमिनेट

Maharashtra Politics: महाराष्ट्रात नवं राजकीय समिकरण, याठिकाणी दोन्ही शिवसेना एकत्र येणार? 'त्या' भेटीमुळे चर्चांना उधाण

Prostate Cancer Risk: सब्जाचं जास्त सेवन आरोग्यासाठी धोक्याचं; अ‍ॅलर्जीपासून ते कॅन्सरपर्यंत वाढतो धोका

SCROLL FOR NEXT