Kunal Kamra : कुणाल कामराच्या शोला गेले, आता अडकले; मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये

Mumbai Police on Kunal Kamra Show : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला असतानाच, आता त्याच्या शोला उपस्थित राहिलेले प्रेक्षकही अडकले आहेत. मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आले असून, नोटीस धाडण्यास सुरुवात केली आहे.
कुणाल कामराच्या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची होणार चौकशी, नोटिसा धाडल्या
Kunal Kamra And Eknath Shinde saam tv
Published On

मुंबईच्या घरी जाऊन चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांवर टीका करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत सापडला आहेत, पण त्याच्या शोला उपस्थित असलेले प्रेक्षक देखील पुरते अडकले आहेत. कामराच्या शोला गेलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

मुंबईतील खार पोलीस सोमवारी कुणाल कामराच्या माहीममधील घरी गेले होते. त्यावर कुणाल कामरानं ट्विट करून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तुमचा वेळ वाया घालवता असा खोचक टोला त्यानं एक्स पोस्टद्वारे लगावला होता. आता मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी कुणाल कामराच्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यात सुरुवात केली आहे.

कुणाल कामराचा २ फेब्रुवारीला मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओत नया भारत हा शो झाला होता. या शोला प्रेक्षकांची गर्दी झाली होती. याच कार्यक्रमात कुणाल कामरा यानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गाण्यातून टीका केली होती. अशा प्रकारे उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणे कामराच्या अंगलट आले आहे.

प्रेक्षकांना धडाधड नोटिसा

कुणाल कामराच्या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांनी नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. स्टँडअप शोमध्ये उपस्थित काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यासही सुरुवात केली आहे. शोमध्ये एकनाथ शिंदेंवर केलेल्या टिप्पणीप्रकरणी ही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १७९ अन्वये काही प्रेक्षकांना नोटिसा धाडल्या आहेत.

याअंतर्गत चौकशीत साक्षीदारांना बोलवण्याचा अधिकार प्राप्त होतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वकील वायपी सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमाला उपस्थित एक ते दोन प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र, त्यासाठी प्रेक्षकांना बोलावण्याची आवश्यकता नाही. कारण या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे आधीपासूनच आहेत.

कुणाल कामराच्या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची होणार चौकशी, नोटिसा धाडल्या
Kunal Kamra : कुणाल कामराची अटक तूर्तास टळली; मद्रास हायकोर्टाकडून दिलासा, VIDEO

कुणाल कामरानं केली होती मुंबई पोलिसांवरही टीका

मुंबई पोलीस कुणाल कामराच्या घरी चौकशीसाठी गेले होते. त्यावर कुणालने एक्स पोस्टद्वारे पोलिसांवर टीका केली होती. जिथे मी गेल्या १० वर्षांपासून राहत नाही, त्या पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ वाया घालवण्यासारखे आहे, असं कामरा म्हणाला होता. दरम्यान, याआधी पोलिसांनी कामराला दोनदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अद्याप तो पोलिसांसमोर हजर झालेला नाही.

शिवसेनेचा इशारा

शिंदेंवर टीका केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी कामराला इशाराही दिला आहे. तसंच मुंबई पोलिसांना पत्र देऊन, एफसीआरए अंतर्गत कामराची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. कुणाल कामरा जेव्हा कधी मुंबईत येईल, त्यावेळी त्याचं शिवसेना स्टाइलने स्वागत केलं जाईल, असा कडक इशाराही कनाल यांनी दिला होता.

कुणाल कामराच्या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांची होणार चौकशी, नोटिसा धाडल्या
Kunal Kamra : कुणाल कामराला न्यायालयाचं संरक्षण, एकनाथ शिंदेंच्या नावाचा थेट उल्लेख नसल्याचा युक्तीवाद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com