Kunal Kamra : कुणाल कामराला न्यायालयाचं संरक्षण, एकनाथ शिंदेंच्या नावाचा थेट उल्लेख नसल्याचा युक्तीवाद

Madras High Court On Kunal Kamra : एकनाथ शिंदेंवरील विडंबन गीतानंतर कुणाल कामरावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र आता कोर्टाने कुणाल कामराला दिलासा दिलाय. कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Madras High Court gives relief to Kunal Kamra orders
Madras High Court gives relief to Kunal Kamra ordersSaam Tv News
Published On

भरत मोहोळकर, साम टीव्ही

चेन्नई : कुणाल कामराचं हे विडंबन गीत ना सरकारला पटलं ना पचलं. त्यामुळेच त्याचे तीव्र पडसाद उमटले. एवढंच नाही तर खार पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे कुणालवर अटकेची टांगती तलवार असतानाच मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिलाय, आणि ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. याआधी कामरानं मद्रास न्यायालयात ट्रान्झिट अँटीसिपेटरी जामिनासाठी अर्ज केला होता. अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयात काय झालं ते पाहूया.

व्हिडीओमध्ये एकनाथ शिंदेंच्या नावाचा थेट उल्लेख नसल्याचा युक्तीवाद

कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याबाबत खार पोलिसांना नोटीस

2 साक्षीदारांसह जातमुचलका भरण्याचे आदेश

दुसरीकडे मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात दुसरं समन्स जारी केलं होतं. त्यासंर्दभातही कुणाल कामरा 31 मार्चला पोलीसांसमोर हजर होणार आहे. 24 मार्चला कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत विडंबन गीत सादर केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाने द हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करत कुणालविरोधात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणाचे विधीमंडळातही पडसाद उमटले. त्यानंतरही कुणाल कामराने हम होंगे कंगाल म्हणत पुन्हा एकदा शिंदेंना डिवचल्याचं पहायला मिळालं.

Madras High Court gives relief to Kunal Kamra orders
Santosh Deshmukh : देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानीयत, मृत्यूचा थरकाप उडवणारे १५ व्हिडीओ; देशमुखांचं विव्हळणंही कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, कुणाल कामराला फरफटत आणून त्याला थर्ड डिग्री देण्याचा इशारा मंत्री शंभुराज देसाईंनी दिलाय. तर संजय राऊतांनीही देसाईंचा चांगलाच समाचार घेतलाय. कुणाल कामराविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.दुसरीकडे अंतरिम दिलासा मिळाला असला तरी अटकेची टांगती तलवार कायम आहे.. मात्र न्यायव्यवस्थेनं जरी कामराला तात्पुरता दिलासा दिला असला तरी राज्यात त्याची वाट पाहाणारे शिंदेसैनिक कामराला मोकळीक देणार का ? आणि त्यांच्या तावडीतून कामरा सहीसलामत सुटणार का हेच पाहायचं.

Madras High Court gives relief to Kunal Kamra orders
Santosh Deshmukh : देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानीयत, मृत्यूचा थरकाप उडवणारे १५ व्हिडीओ; देशमुखांचं विव्हळणंही कॅमेऱ्यात कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com