बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात लाचलुचपत (LCB) पथकाने आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे लाच घेणारे कित्येक अधिकारी त्यांच्या जाळ्यात अडकले आहे. बीड (Beed) जिल्ह्यात लाच घेताना एका तहसीलदाराला लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच, माजगाव (Majalgaon) पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. (Beed Crime News)
रामचंद्र होनाजी रोटेवाड ( वय 30) विस्तार अधिकारी , ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती माजलगाव असे लाचखोर विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी, या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र त्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं आहे.
माहितीनुसार, तक्रारदार हे ग्रामपंचायत केसापुरी येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे 10 वर्षे पूर्ण झाल्याने, सेवाजेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून, तो जिल्हा परिषदला पाठवून केलेल्या कामाबद्दल, 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंती 5 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
आज माजलगाव येथे पंचायत समितीचे समोर पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वत : पंच साक्षीदार समक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान ही कारवाई बीड एसीबीने केली असून या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.