मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) आणि शिवसेना आमदारामधील बैठक संपली आहे. बसमधून सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मालाड मारवे इथल्या हॉटेलात नेलं जाणार आहे.राज्यसभा निवडणूक (Rajya sabha Election) येत्या १० जून रोजी आहे, या निवडणुकीत धोका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावलं उचलली आहे. वर्षा निवासस्थानातील शिवसेना आमदारांची बैठक संपल्यानंतर त्यांना मालाड मारवे येथील हॉटेलमध्ये दोन ते दिवस ठेवण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी आमदारांना न घाबरण्याचा सल्ला दिला आहे. ( Maharashtra Politics News in Marathi )
हे देखील पाहा -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत काय म्हणाले?
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तुम्हाला घाबरवण्याचे धमकावण्याचे प्रयत्न होतील मात्र, कुणालाही घाबरायचं नाही जुमानायचं नाही मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. या निवडणुकीत सेनेच्या उमेदवारांचा विजय होईल. कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई लढायची असून, आगामी काळातील निवडणुकादेखील याच ताकतीने लढायच्या आहेत, पुढील अडीच वर्षेदेखील आपलीच सत्ता असणार आहे असंही ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीसाठी शिवसेनेचे ४० आमदार आणि एक अपक्ष आमदार उपस्थित होते. सध्या ही बैठक संपन्न झाल्यावर सर्व आमदारांना हॉटेल मालाड मारवे येथे नेण्यात येत आहे. या सर्व आमदारांना नेण्यासाठी दोन लक्झरी बसची व्यवस्था केली आहे. येत्या राज्यसभेच्या निवडणुकीत धोका होऊ नये म्हणून शिवसेने सावध पावलं उचलली आहेत. दरम्यान, या राजकीय घडामोडीवर शिवसेना नेते, मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, उद्या महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देईल त्याचे पालन करू'. दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेच्या आमदारांना दोन्ही राज्यसभेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देण्यासाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.