केज तालुक्यात १३ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना
आरोपी हा पीडित मुलीचा चुलत मामेभाऊ असल्याचे समोर
पीडित मुलगी उन्हाळी सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आली होती
केज पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला
Beed Kej Rape Case बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत मामेभावाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यात राहणारी आणि आठवी इयत्तेत शिकणारी पीडित मुलगी उन्हाळी सुट्टीसाठी २२ मे रोजी तिच्या आत्यासोबत केज तालुक्यातील दैठणा येथे मामाच्या गावी आली होती. २५ मे रोजी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी मुलगी घरात एकटीच होती, तर तिची आजी सरपण आणण्यासाठी शेतात गेली होती.
याच संधीचा फायदा घेत मुलीचा २५ वर्षीय चुलत मामेभाऊ घरात आला. त्याने आजीबद्दल विचारणा केली असता ती शेतात गेल्याचे मुलीने सांगितले. घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने आतून दरवाजा बंद केला. मुलीने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचे तोंड रुमालाने बांधले आणि हात दोरीने बांधून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर काही वेळातच आजी परत येत असल्याची चाहूल लागताच आरोपीने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो घरातच गोधडी ओढून लपून बसला. पीडित मुलीने धैर्य दाखवत कशीबशी तोंडावरील गाठ सोडवली आणि दरवाजा उघडून आजीला हाक मारली. आजी घरात येताच आरोपीने तिला जोराचा धक्का देत घटनास्थळावरून पळ काढला.
घाबरलेल्या अवस्थेतील मुलीने संपूर्ण प्रकार आजीला सांगितला. त्यानंतर आजीने तत्काळ मुलीच्या आई-वडिलांना आणि इतर नातेवाईकांना माहिती दिली. २६ मे रोजी नातेवाईक केज पोलीस ठाण्यात (Beed Kej Police Station) दाखल झाले. पीडितेच्या तक्रारीवरून २७ मे रोजी रात्री उशिरा आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(१), ३३३, ११५(२), ३५१(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम ( Police Umesh Nikam ) यांनी रात्रीच आरोपीच्या गावात जाऊन त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.