बीडमध्ये दारुड्या मुलाकडून आईला बेदम मारहाण मारहाणीत आईचा जागीच मृत्यू विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडमध्ये दारुड्या मुलाकडून आईला बेदम मारहाण; मारहाणीत आईचा जागीच मृत्यू

दारुड्या मुलाने जन्मदात्या आईला रात्री बेदम मारहाण केल्याने, वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक अन संतापजनक घटना, बीडच्या चौसाळा गावामध्ये आज उघडकीस आली आहे.

विनोद जिरे

बीड - दारुड्या मुलाने जन्मदात्या आईला रात्री बेदम मारहाण केल्याने, वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक अन संतापजनक घटना, बीडच्या चौसाळा गावामध्ये आज उघडकीस आली आहे. तर आईचा मृत्यू झाल्याचं लक्षात येतात, नराधम आरोपी मुलाने घटनास्थळावरून पलायन केलं होतं. मात्र पोलिसांच्या दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर, अखेर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

हे देखील पहा -

प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे वय 70 वर्ष असं मयत वृद्ध आईचं नाव आहे. तर मदन पांडुरंग मानगिरे वय 28 वर्ष असं नराधम आरोपी मुलाचे नाव आहे. दारुच्या नशेत असणाऱ्या आरोपी मदन मानगिरे याने, मयत आई प्रयागबाई यांना, रात्री 11 ते 12 च्या दरम्यान लागडी मुसळाने जबर मारहाण केली. यामध्ये प्रयागबाई यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू झाला आहे, ही बाब आज सकाळी आरोपी मदनच्या लक्षात येताच, त्याने घरातून पळ काढला.

बीड-गेवराई मार्गे तो महाकाळा येथे सासरवाडीत पोहचला. तिथून तो अन्य ठिकाणी फरार होणार होता. मात्र याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे सपोनि.लक्ष्मण केंद्रे यांना मिळताच, त्यांनी शहागड येथून आरोपी मदन यास ताब्यात घेतले. त्याचबरोबर एक दुचाकी देखील ताब्यात घेतली आहे. दरम्यान मयत वृद्धेचे शवविच्छेदन झाले असून आरोपी नराधम मुलावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया, नेकनूर पोलिस ठाण्यात सुरू आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ना कोणता ब्रश, ना कोणती टूथपेस्ट; फक्त हा एक उपाय करून पाहा, दात मोत्यासारखे चमकतील

Maharashtra News Live Update : जळगाव- सिन्नरकडून येणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची जोरदार धडक; 12 जखमी

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

IBD symptoms: अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा आतड्यांना सूज आलीये!

SCROLL FOR NEXT