Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident : बीडमध्ये कार-ऑटोचा भीषण अपघात; १ ठार

गतवर्षी मयत चालकांच्या वडिलांचा याच ठिकाणी अपघात होऊन झाला होता मृत्यू...

विनोद जिरे

Beed Accident News : बीडमध्ये कार आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात बीडच्या केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील सारूळ शिवारात झाला आहे. तर कार धडकेनंतर ऑटो खड्डयात उलटली. त्यामुळं ऑटो चालक महेश पुरी वय 23, रा. सारूळ ता. केज याचा जागीच मृत्यू झाला आहे.

महेश पुरी हे ऑटो घेऊन नांदूर फाट्याकडे जात असताना सारूळ शिवारात समोरून येणाऱ्या कारने भरधाव वेगात ऑटोला जोराची धडक दिली. या झालेल्या भीषण अपघातात (Accident) ऑटो हे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात जाऊन उलटले.

यात ऑटो चालक महेश पुरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गतवर्षी मयत चालकांच्या वडिलांचा याच ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाला होता. दरम्यान केज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT