संजय गडदे
Mumbai Crime News : घराचे बांधकाम करताना उत्खननात सापडलेले मौल्यवान सोने स्वस्तात ज्येष्ठ नागरिकांना विकून फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली असून एकूण चार आरोपींना विरार भातपाडा येथून अटक केली आहे. अटक आरोपींकडून खोटे सोने आणि दहा लाख रुपये इतका मालमत्ता हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भुलेश्वर मनीभवन परिसरात राहणारे नरेश कुमार तारचंद जैन व त्यांची पत्नी आशा यांनी चार डिसेंबर रोजी शिवकुमार माळी आणि त्याची महिला साथीदार व इतर दोन व्यक्ती यांनी जैन कुटुंबाकडून सुमारे 30 लाख रुपये घेऊन त्या बदल्यात अर्धा किलो वजनाचे पिवळा धातू देउन ते सोने दिल्याचे भासवून फसवणूक केली. खरेदी केलेले पिवळे धातू सोने नसून पितळ असल्याचे समजतात जैन यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली यावरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे वेगाने हलवली.
गुन्हा दाखल होताच सपोनि ओम तोटावार, पोउपनि राहुल वाळुंजकर व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांची तपासणी करून यातील अनोळखी आरोपींचे फुटेज प्राप्त केले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यावर आरोपी हे बोरीवली स्टेशन वरून विरारच्या ट्रेन मध्ये बसुन ते विरार रेल्वे स्टेशन वरती उतरल्याचे दिसुन आले. आरोपीने फिर्यादी यांनी ज्या मो/क्र वरून फोन केला होता त्याचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तपासले असता आरोपी भातपाडा विरार पुर्व येथे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तब्बल पाच दिवस सापळा लावून तयार यांनी दिलेल्या माहितीवरून सर्व चारही आरोपींना भात पाडा विरार पूर्व येथून ताब्यात घेतले. जीवीदेवी मनीलाल परमार (63 वर्षे ) विजयकुमार प्रमेप्रसाद राय ( 33वर्षे) विनय मनीलाल परमार (20 वर्षे) मनीलाल गोमासिंग परमार (43 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.