योगेश काशीद, साम टीव्ही
बीड जिल्ह्यात वर्षभरापासून गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे का असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. खून, हत्या, किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून रक्ताच्या थारोळ्यात पाडणे हे आता बीडमध्ये नेहमीचे झाले आहे. आज पुन्हा एकदा गंभीर घटना घडली आहे. आष्टी तालुक्यातील रूईनालकोलमध्ये सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी\स्टेटस टाकण्याच्या कारणावरून कुरापत काढून झालेल्या वादामध्ये तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले.
उपचारासाठी घेऊन जाताना यामधील एकाच मृत्यू झाला, तर इतर दोघेजण गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दिपक शिवाजी नालकोल वय (वर्ष 20) रा. रूईनालकोल ता. आष्टी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी असलेल्या इतर दोघांवर अहिल्यानगर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळाळलेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जि.प.शाळेच्या समोर सोमवारी तरूणाच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हाटसअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका गटातील तरूणांनी तिघा जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने तिघे गंभीर जखमी झाले. जखमी तरूणांना उपचारासाठी घेऊन जाताना दिपक नालकोलचा यामध्ये मृत्यू झाला.
2 जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी आष्टीचे सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, याच्यासह अंमलदारांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.