Vaijnath Bangar and Abhishek Sanap arrested SaamTV
महाराष्ट्र

Ashok Mohite : सरपंच हत्या प्रकरणाच्या बातम्या का बघतो? आरोपी वैजनाथ अन् अभिषेक पोलिसांच्या जाळ्यात; कर्नाटकातून धरपकड

Beed Ashok Mohite Assault Case Two Accused Arrested : बीडमधील अशोक मोहिते याला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांना कर्नाटकातून ताब्यात घेतलं आहे.

Prashant Patil

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संबंधित बातम्या का पाहतो? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचदरम्यान, आता या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बीडमधले माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात असलेल्या संबंधित बातम्या का बघतो? असा सवाल करत याच प्रकरणातील आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे याच्या मित्राने एका तरुणाला अमानुष हरण केल्याची घटना धारूरमध्ये घडली होती. या घटनेत अशोक मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे. तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.

अशोक मोहिते याला अत्यंत अमानुषपणेही मारहाण करण्यात आलेली असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर हे दोघेही फरार झाले होते. मात्र, फरार झालेले आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना धारूर पोलिसांनी कर्नाटक राज्यातून येथून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचे विशेष पथक या दोघांच्या मागावर होते. अखेर मोबाईल लोकेशनहून या दोघांना कर्नाटकातून ताब्यात घेतलं असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. तर सकाळपर्यंत दोघांना धारूरला आणलं जाईल, अशी माहिती धारूर पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite: साप चावल्यावर लगेच काय करावे?

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT