AMBAJOGAI CHINESE CENTER RAID: FDA SHUTS UNLICENSED FOOD STALL OVER FOOD SAFETY VIOLATIONS Saam Tv
महाराष्ट्र

Beed : बीडमध्ये तुकाराम मुंढेंच्या पथकाची मोठी कारवाई, चायनीज दुकानाला टाळं

Beed FDA Tukaram Mundhe Raid News : अंबाजोगाईतील परवान्याशिवाय सुरू असलेल्या चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून दुकान बंद केले. पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • अंबाजोगाईतील तवक्कल चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

  • कारवाई करून दुकान बंद केलं

  • परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे आणि गंभीर अस्वच्छता आढळल्याचे तपासणीत स्पष्ट

  • अन्नपदार्थ व कच्च्या मालाचे नमुने जप्त

अन्न व औषध प्रशासनाने गेले अनेक महिने फिल्डवर उतरून अवैध कामांची पोलखोल केली. मुंबई सारख्या झगमगत्या शहरांमधील नामंकित हॉटेल पासून ते अगदी गल्लीतील छोट्या मोठ्या स्टॉलवरच्या भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्यात आली. अशातच आता चवीने खाल्ल्या जाणाऱ्या चायनीज सेंटरवरसुद्धा अन्न व औषध प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या टीमने धाड टाकली आहे. बीडच्या अंबाजोगाई शहरात ही कारवाई करण्यात आली असून सदर दुकान बंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरातील तवक्कल चायनीज सेंटरवर सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी तपासणी केली. या वेळी संबंधित चायनीज सेंटरमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे आढळले. तपासणीत संबंधित चायनीज सेंटर कोणत्याही परवान्याशिवाय सुरू असल्याचे तसेच स्वच्छतेच्या मूलभूत निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. स्वयंपाकघर आणि खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली.

पथकाने खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या साहित्याचे आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत. या नमुन्यांचा प्रयोगशाळेत अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत आवश्यक परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, अंबाजोगाई आणि केज परिसरातून निकृष्ट दर्जाचे व अस्वच्छ अन्न विक्रीबाबत अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या कारवाईची माहिती परिसरात पसरताच सदर बाजारातील अनेक हॉटेल्स आणि मांसविक्रीची दुकाने घाईघाईने बंद करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम पुढेही सुरू राहणार असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT