beed news  Saam tv
महाराष्ट्र

Shocking : 'माझं दुःख कोणाला सांगू, एकटा पडलोय'; व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाने आयुष्य संपवलं, बीडमध्ये हळहळ

beed News : बीडमध्ये व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाने आयुष्य संपवल्याचं समोर आलं आहे. तरुणाच्या आत्महत्येने बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

बीडमध्ये तरुणाची आत्महत्या

वाढदिवसाला न बोलावल्याने तरुणाची आत्महत्या

बीडमधील कुंबेफळ गावात घडली घटना

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बोलावले नसल्याच्या कारणातून एकटे पडलेल्या २४ वर्षीय तरुणाने विष पिऊन आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. महेश उद्धव भणगे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या अंबाजोगाईच्या कुंबेफळ गावात राहणाऱ्या महेशने मंगळवारी दुपारी राहत्या घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. महेश घराच्या छतावर एकटाच झोपायला गेला होता. त्यानंतर त्याने छतावर विष पिऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी महेश हा छतावरून खाली आला नाही.

त्याच्या घरातील सदस्य त्याला पाहण्यासाठी रात्री ८ वाजेच्या सुमारास छतावर गेले. त्यावेळी महेश हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. महेशला बेशुद्ध अवस्थेत पाहून त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी महेशचा मित्रांसोबत वाद झाला होता. त्याचा मित्राचा ६ एप्रिल रोजी वाढदिवस होता. नेहमी मित्रांच्या कामात वाढदिवसाच्या नियोजनात पुढाकार घेणाऱ्या महेशला यंदा कोणी बोलावलं नाही. त्याच्या मित्रांनी सोडून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. त्याने आयुष्य संपवण्यापूर्वी मोबाईलवर स्टेटस ठेवला.

'माझं दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो' असं भावनिक स्टेटस महेशने ठेवलं होतं. त्याच्या स्टेटसवरून एकटेपणा आणि नैराश्य दिसून येतोय. महेशने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने कुंबेफळ गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.महेशच्या हट्टासाठी वडिलांनी शेती विकून त्याला अंबाजोगाई शहरात कपड्याचे दुकान टाकून दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT