Beed Shocking Saam Tv
महाराष्ट्र

Beed Shocking : डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी अचानक रडू लागले

Beed Shocking News : बीडमधील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जन्मलेले बाळ मृत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी केली. परंतु ही तयारी सुरू असतानाच बाळ रडू लागले. यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केले.

या प्रकाराची रुग्णालयात चर्चा होत असून आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टर वर कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे. केज तालुक्यातील होळ येथील घुगे कुटुंबाबाबत ही घटना घडली आहे. घुगे कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. परंतु हा घडलेला प्रकार नेमका कशामुळे घडला? यामध्ये दोषी कोण? याची चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

संपूर्ण प्रकरणावर बाळाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रस्तुती झाल्यानंतर बाळ त्यांनी माझ्याकडे दिले आणि बाळ रात्रभर एका पेटीमध्ये कोंडून बांधून ठेवले. सकाळी 'बाळाला घेऊन जा' असे म्हटले. बाळ गेले आहे, असे सिस्टरकडून सांगण्यात आले. आम्ही बाळ गावाकडे घेऊन गेलो आणि बाळ अंत्यसंस्काराच्या वेळी रडू लागले. मग आम्ही नंतर बाळ पुन्हा दवाखान्यामध्ये आणले', असे बाळाच्या आईने सांगितले आहे.

सात तारखेला दुखायला लागले म्हणून आम्ही दवाखान्यात आलो आणि डिलिव्हरी झाली, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ गेले म्हणून सांगण्यात आले आणि नंतर रात्रभर बाळपेटीत कोंडून बांधून ठेवले होते आणि नंतर बाळ घेऊन आल्यानंतर आता बाळ ठीक आहे असे सांगण्यात आले, अशी माहिती बाळाची आई बालिका घुगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या जीवाला धोका; वकिलांच्या अजब दाव्यानं खळबळ

दिवसाढवळ्या कार अडवली, खेचत बाहेर काढलं अन्...; महिला नेत्याच्या अपहरणामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT