BEED SUGAR FACTORY ACCIDENT TWO WORKERS DEAD DURING WELL DRILLING Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Beed Accident News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील जय महेश शुगर फॅक्टरी परिसरात विहिरीत काम करताना भीषण अपघात. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बीडमध्ये शुगर फॅक्टरीत भीषण अपघात; दोन कामगार ठार

  • विहिरीत ड्रिलिंगदरम्यान दुर्घटना घडली

  • दोन कामगार गंभीर जखमी; उपचार सुरू

  • निष्काळजीपणावर प्रश्न; पोलिसांकडून तपास सुरू

योगेश काशिद, बीड

बीडच्या माजलगाव तालुक्यातील जय महेश शुगर फॅक्टरी परिसरात शुक्रवारी भीषण दुर्घटना घडली. कारखान्याच्या आवारातील विहिरीमध्ये आडवे होल (ड्रिलिंग) करण्याचे काम सुरू असताना अचानक झालेल्या अपघातात दोन कामगाराचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कारखाना प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विहिरीमध्ये मशीनच्या सहाय्याने काम सुरू होते. कामादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा अपघात घडला. घटनेवेळी काही कामगार विहिरीमध्ये उतरून काम करत होते. अचानक झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेनंतर कारखाना प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

विहिरीसारख्या धोकादायक ठिकाणी काम सुरू असताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? कामगारांना सुरक्षासाहित्य देण्यात आले होते का? याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिक व कामगारांनी कारखान्याच्या हलगर्जीपणामुळेच हा निष्पाप जीव गेल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित वाहन व मशीन मालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे. काम सुरू करण्यापूर्वी तांत्रिक तपासणी झाली होती का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून जबाबदारांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण दुर्घटनेमुळे मृत कामगाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ही' एक गोष्ट तुमचे केस लांब आणि चमकदार बनवेल

Maharashtra News Live Update: पुण्यात ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा राज्यभरात धडाका; शिर्डीनंतर शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटरवर FDAचा छापा

Supreme Court : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना मिळणार ६३ लाख आणि ७.५ टक्के व्याजाने भरपाई; सुप्रीम कोर्टाचा आदेश

मोठी बातमी! भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT