Beed Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Beed Accident News: अवैध वाळूच्या डंपरची दुचाकीला धडक, ३० वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Beed Dumper And Two Wheeler Accident: या घटनेचा तपास गेवराई पोलिसांकडून (Gevrai Police) सुरु आहे. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

Beed News: बीडमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीसह (Dumper And Bike Accident) तरुणाला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई शहराजवळ ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये ३० वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास गेवराई पोलिसांकडून (Gevrai Police) सुरु आहे. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई शहराजवळ अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या ३० वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गेवराई पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतलं.

प्रल्हाद दशरथ नेमाने (30 वर्षे. रा. धनगर गल्ली, गेवराई) असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रल्हाद आपल्या दुचाकीवरुन गेवराई शहराकडे जात होता. त्याचवेळी बाह्यवळणाच्या रस्त्यावर त्याच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या वाळूच्या डंपरने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की प्रल्हादचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला आहेर वाहेगाव शिवारातून ताब्यात घेतले. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, येवल्यामध्ये देखील अशीच घटना घडली आहे. ट्रकच्या धडकेत होमगार्डचा जागीच मृत्यू झाला आहे. येवला-कोपरगाव रस्त्यावर दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. होमगार्ड प्रदिप भावसार हे दुचाकीवरुन जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार घडक दिली. या अपघातामध्ये प्रदिप भावसार हे गंभीर जखमी झाले. नाशिक येथे त्यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. येवला शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला असून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lado Laxmi Yojana: महिलांना दर महिन्याला मिळतात २१०० रुपये; लाडो लक्ष्मी योजना आहे तरी काय?

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरेंचा आज नाशिक दौरा

साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला जाताना अपघात, कार ३०० फूट दरीत कोसळली

Office Snacks Ideas : ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड सोडा अन् 'हा' पदार्थ खा

Walnut Halwa Recipe: अक्रोडाचा गुळगुळीत हलवा, मेंदूची शक्ती वाढवणारा पारंपरिक स्वाद आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT